Home | National | Other State | seven of a family killed in Chhattisgarh Accident

रस्त्यावर विखुरले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, इतका भयंकर अपघात की हवेत 8 फुट उडून फेकल्या गेली बोलेरो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 03:02 PM IST

जत्रा पाहून घरी येत होते कुटुंब

  • seven of a family killed in Chhattisgarh Accident

    रायपूर - येथे बोलेरो कार आणि खडींनी भरलेल्या ट्रकची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रायपूरपासून 10 किमी अंतरावर दुधगाव येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले. या अपघातातील ट्रक ड्रायव्हर सध्या फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.


    8 फुट उडाली बोलेरो
    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात लोडेड ट्रकने समोरून येणाऱ्या बोलेरोला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की बोलेरो हवेत 8 फुट उडून कोसळली. या अपघातात 3 जणांचा जागीच तर 4 जणांचा उपचारासाठी नेले जात असताना मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक अनंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. सोबतच, इतर 2 जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात बोलेरोचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. त्यातील मृतदेह इतके वाइट अडकले होते की त्यांना बाहेर काढणे खूप कठिण होते. प्राथमिक माहितीनुसार, हे सगळेच कुटुंबीय एक जत्रा पाहून घरी येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाचा घाला झाला.

Trending