आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये सात दहशतवादी घुसले: पंजाबपासून दिल्लीपर्यंत सर्व राज्यांत अलर्ट जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - पंजाबच्या फिरोजपूरमध्ये जैश-ए-मोहंमदचे सात दहशतवादी घुसले असल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती असून हे दहशतवादी घातपात घडवण्यासाठी दिल्लीच्या दिशेने जात आहेत. दरम्यान, ही माहिती मिळताच पंजाबपासून दिल्लीपर्यंत सर्व राज्यांत अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हे दहशतवादी आयईडी स्फोट घडवू शकतात, अशी माहिती असून विशेषत: ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत अशा राज्यांत घातपात घडवला जाण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

 

सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिस या दहशतवाद्यांचा शोध घेत असून पठाणकोटच्या माधोपूर भागात बुधवारी चार संशयितांनी एक कार बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली हाेती.

बातम्या आणखी आहेत...