आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत आढळला सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, दगडाने ठेचून केली हत्या; पोलिसांत गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी येथे सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडला. शनिवार रात्री मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतरच तिचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोईवाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलगी सुभाष नगर भागातील घरातून शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बेपत्ता झाली होती. यानंतर तिच्या पालकांनी शोध घेतला असता ती सापडली नाही. अखेर पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या औद्यागिक युनिटजवळील झुडूपात रविवारी सकाळच्या सुमारास सापडला. मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आला असून पुढीत तपास सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...