आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, 75 वर्षीय वृद्धास तीन वर्षांचा कारावास, तीन हजार रुपये दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी : सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्ध आरोपीस न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. विक्रम माधवराव घुले असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ सुनील जी. वेदपाठक यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली.

घनसावंगी तालुक्यातील एका गावातील पीडित ७ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात चाेर-पोलिस खेळ खेळत असताना आरोपी विक्रम याने रामफळ व कैरी देतो असे म्हणून तिला स्वत:च्या घरात नेले. त्यानंतर वाईट हेतूने घराचे दार बंद करून तिची अतिशय वाईट पद्धतीने छेड काढून विनयभंग केला. याप्रकरणी मुलीच्या आईने घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल एम. पी. बिक्कड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पीडित मुलगी, तिची मैत्रीण, पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच तपासिक अंमलदार एम. पी. बिक्कड यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीस शिक्षा सुनावली.