आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seven Youths Sleeping Sibling By Becoming Ghosts Arrested For Making Prank In Bangalore

प्रँक करणाऱ्यांनो सावधान...बंगळुरूमध्ये भूत बनून लोकांना घाबरवणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - लोकांसोबत प्रँक करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. वीस ते बावीस वर्षीय युवक बंगळुरूतील यशवंतपुर रोडवर शरीफनगर येथे रात्रीच्या वेळी प्रवाशांसोबत प्रँक करत होते. हे सर्वजण रात्री पांढरा कपडा परिधान करत आणि लांब केसांचा विग घालून भूत बनत रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या लोकांना घाबरवत होते. घाबरलेल्या लोकांचे प्रँक बनवत सोशल मीडियावर व्हायरल करत होते. सोला देवनहल्ली पोलिसांनी सांगितले की, रविवारी आणि सोमवारी रात्री 2 वाजता शान खालिक (वय 20 वर्ष) आणि त्यांच्या मित्र प्रँक करत होते. त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि इतर पाच जणांना अटक केली आहे. 
नुकताच त्यांचा प्रँक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे युवक रात्रीच्या वेळी एका ऑटोचालकाला घाबरवत असल्याचे दिसत आहे. भीतीमुळे ऑटोचालक आपली रिक्षा माघारी घेऊन जातो. युवकांच्या वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी बीट कॉस्टेबलला तैनात केले होते. 

ऑटोचालकाच्या तक्रारीनंतर केली कारवाई
 
डीसीपी नॉर्थ शशिकुमार यांनी सांगितले की, ऑटोचालकाने आपल्या तक्रारीत रस्त्यावर भूत असल्याचे सांगितले होते. दरम्यान तरुणांच्या प्रँक करण्याच्या तक्रारी यापूर्वी आली होती. काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व तरुण जवळील रहिवासी असून गंमत म्हणून लोकांना घाबरवण्याचे काम करत होते.