आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'चा अाज सातवा वर्धापन दिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अल्पावधीतच लाखाे जळगावकरांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या 'दिव्य मराठी'चा सातवा वर्धापन दिन मंगळवारी साजरा हाेत अाहे. यानिमित्ताने स्नेहमिलनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. वाचकांच्या विश्वासाची सात वर्षे 'दिव्य मराठी'ने पूर्ण केली आहेत. या यशस्वितेत जळगावकरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ही यशपूर्ती होऊ शकली. म्हणून मंगळवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून लाडवंजारी मंगल कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, इच्छादेवी चौफुली, जळगाव येथे स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे संपादक प्रशांत दीक्षित, बिझनेस हेड बी.एस. शेखावत, निवासी संपादक त्र्यंबक कापडे, युनिट हेड सुभाष बोंद्रे यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...