आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा ‘जोगेश्वरी’च्या भरोसे, डोंगराच्या कुशीत आहेत मंदिरासह लेणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोंगराच्या कुशीत आहेत मंदिरासह लेणी, १२ खणांचा विहार
  • मुंबईतील जोगेश्वरीचे पीठ, परंतु पुरावा नाही

महेश जोशी 

औरंगाबाद - हिरवागार निसर्ग, त्यास साद घालणाऱ्या डोंगर रांगा, जोगेश्वरी देवीचे मंदीर आणि मंदीरासमोरील डोंगरात असणाऱ्या प्राचीन लेणी आणि १२ खणांचा विहार. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळचे हे  ऐतिहासीक वैभव अजुनही जगासमोर आलेले नाही. राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असतांनाही जागेश्वरी लेणी मंदीरात समस्यांचा महापूर आहे. येथे एकही सुरक्षारक्षक, कायमस्वरूपी कर्मचारी नाही. यामुळे संरक्षीत वास्तूच्या नियमांची सर्रास पायमल्ली हाेते. लेणीत स्वयंपाक केला जातो. शिल्पांना रंगरंगोटी केली जाते. लेणीपर्यंत पोहचण्याचा मार्ग बिकट आहे.  येथे जाण्याऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या मार्गावर एसटी धावत नाही. इतर कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. लेणी परिसर वगळता रस्त्यात लाईटची सोय नाही. डोंगरात ससे, तरस, लांडगा, बिबट्या, अस्वल असे प्राणी आहेत. याच डोंगर रांगात केळगाव मुर्डेश्वर, इंद्रगडी, कळसाई आणि मनुआई ही देवस्थाने आहेत. त्यांच्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.संरक्षित वास्तू घोषित

२००० मध्ये राज्य पुरातत्व खात्याने या लेणीला पुरातन वास्तू व स्थळे संरक्षण कायदा १९६० अंतर्गत संरक्षित वास्तूचा दर्जा दिला. तरी लेण्यांच्या संवर्धनासाठी फार प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. खात्याच्या लेखी लेणीची माहिती केवळ तीन ओळीत लिहिलेली आहे. कायद्याप्रमाणे वास्तूच्या परिसरात बांधकाम करणे तर वास्तूच्या सौंदर्यीकरणासही परवानगी देता येत नाही. बारा खणांचा विहार

मुख्य लेणी समोरील डोंगरात ६ अपूर्ण लेणी कोरलेल्या आहेत. त्याला बारा खणांचा विहार म्हटले जाते. केवळ रेखोटे मारलेले आहेत. या लेणी अगदी प्राथमिक अवस्थेत कोरून सोडून दिल्या आहेत. निझाम काळात या ठिकाणी घोडे बांधले जायचे, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. निझाम सरकारच्या राजवटीत येथे नाका असल्याच्या खुना आजही दिसतात.सातव्या शतकातील अमूल्य ठेवा

मुख्य लेणी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वूपूर्ण आणि कलात्मक आहे. लेणीच्या प्रवेशद्वारासमोर जोगेश्वरी देवीची सिंहवासीनी दुर्गेच्या रूपातील रेखीव, सुंदर मूर्ती आहे.  या लेणीत त्रिमूर्ती, विष्णूचा वराह अवतार, नृवराह, महिषासुर मर्दिनी आदी शिल्पे कोरली असून त्यांची झिज झाली आहे. लेणीच्या पायथ्याशी कुंड असून येथे बारमाही पाणी असते. कुंडावर ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. …म्हणून येथे लेणी

भारतीय पुरातत्त्व खात्याचे तत्कालीन स. संचालक डॉ.ए.एम.शिराळकर आणि चमूने या लेणी जगासमोर आणल्या. त्यानंतर पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ.जामखेडकर यांनी लेणीला भेट देऊन पाहणी केली. लेणीचे ठिकाण व अन्य ठिकाणात साधर्म्य असल्याचे त्यांनी सांगितले.पुरातन खात्याने दिला होता प्रस्ताव

येथील विकासासाठी पुरातत्व खात्याने २०१० मध्ये ६७ लाख रुपयांचा एक प्रस्ताव शासनाला सादर केला होता. यात लेणीचा एकूण परिसर आयडेंटीफाय करणे, त्याच्या भोवती संरक्षण भिंत बांधणे, महामार्गावर व लेणीच्या ठिकाणी माहिती देणारे फलक लावणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे आदींसह प्रस्ताव दिला होता.दुर्लक्षित वास्तू

हे मंदिर मुंबईच्या जोगेश्वरी देवीचे हे उपपीठ असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यभरातून भाविकांचा ओघ असतो. येथील देणगीदारांच्या फलकावर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. बाहेरील भाविकांसाठी श्रद्धास्थान असणारे हे ठिकाण परिसरातील नागरिक वगळता इतरांना फारसे माहितीही नाही. 

बातम्या आणखी आहेत...