आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seventy seven Footless Dry Wells, 70 Shivsainik\'s Unstoppable Movement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तर फूट कोरड्या विहिरीत ७० शिवसैनिकांचे बेमुदत आंदोलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे राज्य सरकारकडून आलेले अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीने वाटप करावे, या वर्षी भीषण दुष्काळ असल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात या मागणीसाठी सोमवार ७ जानेवारी रोजी ७० शिवसैनिक महिला व पुरुषांनी बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे ७० फूट खोल कोरड्या विहिरीत सकाळपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. विहिरीत जाण्यासाठी पायऱ्या नसल्याने चक्क क्रेनद्वारे आंदोलक विहिरीत उतरले. विहिरीत सतरंजी अंथरून जोरदारपणे आंदोलनाला सुरुवात केली. सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तहसीलदार किंवा महसूलच्या कोणत्याही अधिक ऱ्याने   आंदोलकांची भेट घेतलेली नव्हती.


२०१६-१७ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे राज्य सरकारकडून ५२ कोटी रुपयांचे अनुदान आले असून हे अनुदान बीडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पडून आहे. हे अनुदान सध्याची दुष्काळाची परिस्थितीत लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वाटप करावे, जिल्ह्यातील पशुधन वाचण्यासाठी सरकारने चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, साखर कारखान्यांनी वेळेत गाळपासाठी ऊस न नेल्याने जळालेल्या उसाचे पंचनामे करावेत, त्याच बरोबर स्वस्त धान्य देण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. पाच दिवसांत जिल्हा प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने शेवटी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अॅड. संगीता चव्हाण, तालुका प्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी नऊ वाजता बीड तालुक्यातील कुटेवाडी शेतकरी विक्रम पांडुरंग कुटे यांच्या ७० फूट खोल कोरड्या विहिरीत सकाळी साडेनऊ वाजता क्रेनद्वारे उतरून शिवसैनिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात जिल्हा सचिव जयसिंग जयसिंग चुंगडे, उपजिल्हाप्रमुख परजाना शेख, तालुका प्रमुख शामल पवार, संजीवनी सुरवसे, रेखा इंगोले, अनिता टिक्के, सुषमा तांगडे, राणी जाधव, पूजा गनगे, रेश्मा गनगे ,वैशाली काकडे या महिला सहभागी झाल्या आहेत. 

 

राजेंद्र मस्के यांचा पाठिंबा
कुटेवाडी येथील विहिरीत शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळताच युवक नेते राजेंद्र मस्के यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी जाऊन भेट दिली. क्रेनद्वारे विहिरीत उतरल्यानंतर त्यांनी आंदाेलकांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.याच प्रश्नावर मी जेव्हा आंदोलन केले होते तेव्हा या सरकारने आम्हाला वेड्यात काढायचे काम केले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी या आंदोलनातून माघार घेऊ नये.  मित्रमंडळ आंदोलकांच्या पाठीशी असल्याचेही  मस्के म्हणाले. 

 

 

आंदोलकांच्या मागण्या राज्यस्तरावरील
 आंदोलकांच्या मागण्या  राज्य स्तरावरील आहेत.  आंदोलकांचे निवेदन स्वीकारले असून तहसीलदारांना या आंदोलनाची मी कल्पना दिली अाहे. शासन स्तरावरच या मागण्या सुटतील.
बी.आर.नागरे, नायब, तहसीलदार