आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन / हायजॅक केलेल्या बसने वाटसरूंना चिरडले, 8 जण ठार; ड्रायव्हरवर झाला चाकूहल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुजियान प्रांतात मंगळवारी दुपारी झाली घटना, 22 जण जखमी

पोलिसांनी बसचे अपहरण करणाऱ्याला केली अटक

 

बीजिंग - चीनच्या फुजियान प्रांतातील लोंगयान शहरात हायजॅक केलेल्या एका बसने वाटसरूंना चिरडले. यादरम्यान 8 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

 

ड्रायव्हरवर हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट नाही...
पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये स्वार एका व्यक्तीने ड्रायव्हरवर चाकूने हल्ला केला होता. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तथापि, हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपीची चौकशी सुरू आहे. सूत्रांनुसार, आरोपीची ड्रायव्हरसोबत वैयक्तिक भांडण असू शकते.

 

अशा प्रकारच्या अनेक घटना आल्या समोर

चीनमध्ये मागच्या काही काळापासून अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात रस्ता क्रॉस करत असलेल्या चिमुरड्यांना एका कारने चिरडले होते. या दुर्घटनेत 5 जण ठार झाले होते, तर 18 जण जखमी झाले होते.


नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच एक बस पुलावरून खाली पडली होती. या अपघातात 15 जणांचे प्राण गेले होते. चौकशीत आढळले की, एक प्रवासी ड्रायव्हरशी भांडत होता. यादरम्यान बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला होता.


फेब्रुवारीत एका व्हॅनमध्ये आग लागली होती. यादरम्यान पायी जात असलेल्या प्रवाशांना व्हॅनने चिरडले होते. या अपघातात 18 जण जखमी झाले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...