आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'या\' भाजप नेत्याचा अश्लील Video व्हायरल, हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत होते नेते, तर महिलेच्या हातात मद्याचा प्याला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी, हरियाणा - आपल्या एका नेत्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हिडिओ एका हॉटेलमध्ये शूट करण्यात आला आहे. यात भाजप नेता एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हरियाणाचे भाजप नेते गोपाल शरण गर्ग यांनी 'हरियाणा व्यापारी कल्याण बोर्डच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हा आपल्याविरुद्ध असलेला राजकीय कट असल्याचे म्हटले आहे.

 

व्यापारी कल्याण बोर्डाचे होते चेअरमन

- गर्ग यांनी नुकताच सरकारला आपला राजीनामा पाठवला आहे. तथापि, ते आता मीडियासमोर आले. ते म्हणाले की, हा व्हिडिओ बनावट आहे. व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती ते नाहीत. हा त्यांच्या बदनामीचा प्रयत्न आहे.
- उल्लेखनीय आहे की, फेब्रुवारी 2016 मध्ये जाट आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेनंतर सरकारने हरियाणात व्यापारी कल्याण बोर्डाची स्थापना केली होती. 4 डिसेंबर 2017 रोजी गोपाल शरण गर्ग यांना बोर्डाचे चेअरमन बनवण्यात आले होते.

 

अज्ञातांनी माध्यमांना पाठवल्या क्लिपिंग्ज

- एका आठवड्यापूर्वी नारनौल शहरता चर्चा सुरू झाली होती की, एका राज्यस्तरीय नेत्याच्या अश्लील कृत्यांची सीडी तयार झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजून 21 मिनिटांनी नारनौलच्या अनेक वृत्तपत्रांना एका अज्ञात ईमेलवरून या व्हिडिओच्या 4 क्लिपिंग पाठवण्यात आल्या.

 

- या क्लिपिंग पाहिल्यानंतर त्यात जी व्यक्ती दिसते, तिचा चेहरा चेहरा चेअरमनच्या चेहऱ्याशी जुळतो. व्हिडिओतील व्यक्ती हॉटेलच्या रूममध्ये एका महिलेसोबत नग्नावस्थेत दिसत आहे. महिलेच्या हातांमध्ये मद्याचा ग्लास आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या रूममये शूट केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने जीन्स घातलेली असून तो जवळच बसून असलेला दिसून येत आहे.

 

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकीय क्षेत्रात खळबळ 
- व्हिडिओ समोर आल्यानंतर एका तासात तो भाजप नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या मोबाइलमध्ये पोहोचला. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर या अश्लील व्हिडिओ कांडाबाबत मुख्यमंत्री तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनाही माहिती देण्यात आली. मग गर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले.


- पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला म्हणाले की, अश्लील व्हिडिओची आम्हाला माहिती नाही. व्यापारी कल्याण बोर्डाचे चेअरमन गोपालशरण गर्ग यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित व्हिडिओ व फोटोज...  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...