आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा अश्लील सीडी कांड, बसपमधून निलंबित नेत्या म्हणाल्या- माझ्याकडे आहेत पक्षनेत्यांचे आक्षेपार्ह Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छत्तीसगड) - राज्यातील सीडी कांडाच्या चर्चेनंतर आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) नेत्यांच्या अश्लील सीडीची चर्चा सुरू झाली आहे. पक्षामधून निलंबित महिला नेत्या कामदा जोल्हे यांनी बुढातालाब येथील आंदोलनस्थळावर एक सभा घेऊन त्यांच्याकडे पक्षनेत्यांची अश्लील सीडी असल्याचा दावा केला. त्या असेही म्हणाल्या की, सीडी आणि व्हिडिओ क्लिपिंग त्या पोलिस अधीक्षकांना सोपवणार आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

 

असे आहे प्रकरण...

मंगळवारी बसपमधून निलंबित नेत्या जोल्हे आणि एमपी मधुकर यांनी आंदोलन सभा घेतली. यादरम्यान त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप ठेवले. सोबतच प्रभारी एमएल भारती आणि प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश वाजपेयी यांना हटवण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी आयोजित सभेला संबोधित करताना म्हणाल्या की, येत्या 13 ऑक्टोबर रोजी त्या पक्षाध्यक्ष मायावतींची भेट घेऊन तक्रार देणार आहेत. बसपमधून निलंबित माजी महासचिव एमपी मधुकर यांनी आरोप केला की, प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी तिकिटासाठी सौदेबाजी करतात.

 

पक्षनेत्यांची अश्लील सीडी असल्याचा दावा
त्यांच्याजवळ सीडी, मोबाइलमध्ये पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट आणि ऑडिओ टेपसुद्धा आहे. यात पक्षाशी जोडलेल्या अनेक महिला आणि तरुणींसोबत अश्लील बोलल्याचा पुरावाही आहे. बसपामधून निलंबित केल्यानंतर या विरोधात आयोजित या आंदोलनात देशभरातून 25 हजारांहून जास्त समर्थक सहभागी झाले.

 

प्रभारी म्हणतात- कट रचून बदनामीचा प्रयत्न...
तथापि, याप्रकरणी राज्य प्रभारी भारती म्हणाले की, आमच्याविरुद्ध कट रचून खोटे आरोप ठेवले जात आहेत. पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. तिकीट न मिळाल्याने निराधार आरोप केले जात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...