आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललितचे मार्गदर्शन; बीडच्या पाचवर्षीय चिमुकल्यावर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात बीड जिल्ह्यातील माजलगावच्या एका पाचवर्षीय मुलावर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया करून त्याला पुरुषत्वाची मूळ अाेळख मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू झाला अाहे. या टप्प्यातील पहिली शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वी झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ललिता साळवेचा ललित झालेल्या माजलगावच्या पाेलिस कर्मचाऱ्यानेच यासाठी संबंधित कुटुंबीयांना मार्गदर्शन करून डाॅक्टरांपर्यंत पाेहाेचवले.

 

माजलगाव येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबात पाच वर्षांपूर्वी या मुलाचा जन्म झाला. मात्र पुढे त्याच्या शरीरावर असलेल्या पुरुष लिंग आणि वृषणांची वाढच झाली नाही. त्यामुळे पालकांनी त्याला बालपणापासूनच मुलगी म्हणूनच वाढवण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी ललित साळवे यांच्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे पाहून त्यांनी यांनीही आपल्या मुलाची लिंग पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. मुलाचे पिता हे वाहनचालक असून माजलगाव पोलिस ठाण्यासमोरच त्यांच्या भावाचे दुकान आहे. आपल्या मुलीच्या समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी ललित साळवे यांच्याशीच संपर्क साधला. ललित यांनी सेंट जाॅर्ज रुग्णालयातील डॉक्टर्सशी त्यांचा संपर्क करून दिला. तरीही या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीय आणि नातेवाइकांना राजी करणे सोपे नव्हते. अखेर कुटुंबीयांची समजूत काढत शस्त्रक्रिया करण्याच निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी मुलगा आणि वडील मुंबईत आले. रुग्णालयात त्याच्यावर लगेच वैद्यकीय चाचण्या पार पडल्या. या तपासणीनंतर लिंग पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी या प्रक्रियेतील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.    

 

पुढचा टप्पा हार्माेनल रिप्लेसमेंटचा : डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाच्या शरीरात योग्य ठिकाणी वृषण नव्हते, त्यामुळे त्यांची नीट वाढ होण्यात बाधा येत होती. पहिल्या शस्त्रक्रियेद्वारे ही समस्या सोडवण्यात आली. आता हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी सुरू करण्यात आली आहे. हा या संपूर्ण प्रक्रियेतील पहिला टप्पा असून रुग्णावर आणखी काही शस्त्रक्रिया करण्यात येतील.

 

 

बातम्या आणखी आहेत...