आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sex Worker Shocked After Met Her Client In Her Daughter Schools Function

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या शाळेतील कार्यक्रमात गेली होती सेक्स वर्कर, तेथे आपल्या क्लाइंटला पत्नीसोबत पाहून झाली हैराण; तिला समजले नाही की काय करावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मेलबर्न : ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका सेक्स वर्करने एका सोशल मीडिया साइटवर तिच्यासोबत घडलेला एक वेगळाच अनुभव शेअर केला आहे. मुलीच्या शाळेत तिचा आणि तिच्या क्लाइंटचा सामना झाला होता. तो व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसोबत त्या कार्यक्रमात आला होता. त्याला तेथे पाहून फक्त महिलाच शॉक झाली नव्हती तर त्यादिवसापासून त्या व्यक्तीने तिच्याशी भेटणे देखील बंद केले. कारण त्याचा मुलगा एका सेक्स वर्करच्या मुलीसोबत शिकत आहे हे जाणून त्याला खूप वाईट वाटले होते. 


प्रियकराने धोका दिल्यानंतर झाली सेक्स वर्कर 

- ही गोष्ट ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका सेक्स वर्करने एका सोशल मीडिया साइटवर शेअर केली आहे. सदर महिला 10 वर्षांपूर्वी हाँगकाँगमध्ये राहत होती. प्रियकराने धोका दिल्यानंतर तिने सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 

- यादरम्यान चार वर्षानंतर माइक नामक युवकाची तिची ओळख झालीय ती सेक्स वर्कर असूनदेखील माइक तिला पसंत करत होता. यानंतर दोघांनी लग्न केले आणि ती एका मुलीची आई बनली. 

- लग्नाच्या पाच वर्षानंतर माइकच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आणि यांचे लग्न मोडले. यानंतर महिला आपल्या मुलीसोबत मेलबर्नला परत आली होती. 

 

 

लग्न तुटल्यानंतर पुन्हा झाली सेक्स वर्कर

- ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर नोकरी मिळाली नसल्याने महिलेला पुन्हा एकदा प्रोस्टिट्यूशनमध्ये यावे लागले. काही दिवसांनी बिल नावाच्या व्यक्तीसोबत तिची भेट झाली. बिल दर दोन आठवड्यात तिच्याकडे येत होता. महिलेला बिलबाबत फक्त एवढेच माहीत होते की, तो विवाहीत असून त्याला मुलबाळं आहेत.  

- आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर महिलेने आपल्या मुलीचे एका प्रायमरी शाळेत अॅडमिशन केले. तेथे शिक्षण घेणाऱ्या इतर मुलांच्या आईंसोबत तिची ओळख झाली. पण ही महिला काय काम करत आहेत याबाबत त्यांनी काहीही माहीत नव्हते. 

- काही दिवसांनंतर शाळेत झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये महिलेच्या मुलीने सहभाग घेतला होता. आपल्या मुलीला प्रोत्साहित करण्यासाठी महिला तेथे आली होती. शाळेत पोहोचल्यानंतर ती आणि बिल अचानक एकमेकांसमोर आले. बिल आपल्या पत्नी आणि मुलांसोबत आला होता. 

 

व्यक्तीला पाहताच महिलेला बसला धक्का

- महिलेच्या मते, कार्यक्रमात बिलची पत्नी आणि मी जवळच बसलो होतो. त्यामुळे बिलला देखील माझ्या जवळ बसावे लागले. पण माझी आणि त्याच्या बायकोचे हॅलोच्या पुढे काही बोलणे झाले नाही. 

- मला आठवले की, जेव्हा बिल पहिल्यांदा मला भेटला होता, तेव्हा त्याच्या पत्नीला सेक्स अजिबात आवडत नसल्याचे त्याने मला सांगितले होते. यामुळे वर्षभरात मोठ्या कष्टाने दोघांमध्ये संबंध बनत होते. ही गोष्ट माहीत झाल्यावर मी हैराण झाले होते. 

- शाळेत झालेल्या कार्यक्रमात पती-पत्नीला सोबत पाहून मला थोडे वाईट वाटले. कारण यानंतर बिल मला भेटायला येणार अशी भीती वाटत होती. पण मी चुकीचा विचार करत होते. कारण त्याच आठवड्यात बिल मला भेटायला आला आणि त्याने शाळेतील कॉन्सर्टविषयी एक शब्द देखील काही बोलला नाही. पण त्यासोबत ती शेवटची भेट होती. त्यानंतर तो कधीच मला भेटायला आला नाही. 

- आमच्या दोघांची मुले एकाच शाळेत शिकत असल्याचे त्याला आवडले नसावे. ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीचा इगोहर्ट करणारी होऊ शकते. कदाजित शर्मिंदगी टाळण्यासाठी तो माझ्यापासून दूर गेला असेल.