आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सश्रम कारावास; परभणी जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहरातील बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फलके यांनी सोमवारी(दि.१०) सुनावणी. 


दर्गा रस्त्यावरील रहिमनगर भागात मित्रासोबत खेळत असलेल्या एका बालकास १५ जानेवारी २०१६ त्याच परिसरातील सय्यद अन्सार याने आईस्क्रीम घेऊन देण्याचे आमिष दाखवत नेले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास भीमनगरातील रेल्वे गेट जवळ तो पिडीत मुलगा त्याच्या वडिलांना आढळून आला. त्याने वडिलांना आपबीती सांगितली. त्यावरून मुलाच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात सय्यद अन्सार याच्या विरुद्ध बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक श्री खरात यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी साक्षीदारांच्या नोंदवलेल्या साक्षी व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...