आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; शिक्षिकेला पाच वर्षांची शिक्षा, दंडही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पायाची मालिश करून घेताना दोषी शिक्षिका. - Divya Marathi
मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पायाची मालिश करून घेताना दोषी शिक्षिका.

अकोला - शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन करून त्यांच्याकडून पाय चेपून घेणे व मालिश करून घेत त्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवत 
पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शीतल अवचार असे या गुन्हेगार शिक्षिकेचे नाव आहे. 

मलकापूर परिसरातील शासकीय मूकबधिर विद्यालयात शीतल अवचार कार्यरत होती. मूकबधिर विद्यार्थ्यांकडून ती पायांची मालिश करून घेत होती. नंतर ती आरामात शाळेतच झोपायची. याबद्दल विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण म्हणजेच पोस्को कायद्यान्वये १३ ऑक्टोबर २०१३ रोजी गुन्हा दाखल करून नंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शिक्षिकेस दोषी ठरवत पाच वर्षांचा कारावास आणि ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याची अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पालकांनी सुरुवातीला मुलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र नंतर एका पालकाने मुलाजवळ मोबाइल दिला. त्यानुसार एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने हातपाय चेपून घेत असतानाचा व शिक्षिका झोपल्याचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर पालकांनी शाळेत धडक देत खदान पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.