Home | National | Other State | Sexual exploitation of girls in girl's hostel in U.P.

यूपीमध्ये बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण; २४ मुलींची सुटका, १८ बेपत्ता

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Aug 07, 2018, 06:02 AM IST

यूपीच्या देवरिया येथील बालिकागृहात मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे.

  • Sexual exploitation of girls in girl's hostel in U.P.

    देवरिया- यूपीच्या देवरिया येथील बालिकागृहात मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, येथून रात्री मुलींना बाहेर पाठवले जात होते. त्या पहाटे रडवेल्या अवस्थेत परतत होत्या. रविवारी एका मुलीने येथून पळून थेट पोलिस ठाणे गाठल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पाेलिसांनी २४ मुलींची सुटका केली. अद्याप १८ मुली बेपत्ता आहेत. हे बालिकागृह अवैधरीत्या चालवले जात होते. यूपी सरकारने ते बंद करण्याचा अादेश वर्षभरापूर्वीच दिला होता.


    मां विंध्यवासिनी बालगृह संस्थेच्या संचालिका गिरिजा त्रिपाठी, पती मोहन त्रिपाठी व मुलाला पोलिसांनी अटक केली. संस्थेच्या रजिस्टरमध्ये ४२ मुलींची नावे आहेत. इतर मुली कुठे गेल्या, याची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

Trending