आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चल खेळायला जावू, असे सांगून नऊ वर्षीय बालकासोबत मित्रानेच केले अनैसर्गिक कृत्य, अमरावतीमधील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलाला तेरा वर्षीय मित्राने खेळायला जावू असे सांगून सोबत नेले. त्यानंतर अंबिकानगर परिसरातील एका निर्मण्युष्य ठिकाणी नऊ वर्षीय बालकावर अनैसर्गीक कृत्य केले. हा प्रकार सोमवारी (दि. 7) दुपारी घडला. पीडित मुलाच्या वडीलांनी मंगळवारी (दि. 8) दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी तेरा वर्षीय मुलाविरुध्द अनैसर्गीक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

पीडित नऊ वर्षीय मुलगा घरासमोर उभा होता. त्याचवेळी मित्र असलेला तेरा वर्षीय मुलगा त्याच्याजवळ आला आणि आपण खेळायला जावू, असे म्हणून त्याला सोबत घेवून गेला. त्यानंतर या तेरा वर्षीय मुलाने गैरकृत्य केले. दरम्यान सोमवारी सांयकाळी हा मुलगा घरी गेल्यानंतर त्याला वेदना होवू लागली, त्यामुळे तो रडत होता. त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. आईने हा प्रकार मुलाच्या वडीलांना सांगताच त्यांनी मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कलम तसेच अनैसर्गिक  कृत्य करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...