आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo बॉलीवुडमधील सलमान खानवर मॉडेलने केला सेक्सुअल हॅरेसमेंटचा आरोप, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> दुबईत सलमानकडून मॉडेलसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न  
> 'डान्स इंडिया डान्स'चा विजेता आहे सलमान यूसुफ खान

 

मुंबई- 'डान्स इंडिया डान्स'चा विजेता आणि कोरियोग्राफर सलमान युसूफ खानवर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सलमानविरोधात‍ गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. तक्रारदार महिला एक डान्सर आहे. एका शोमध्ये सलमानने पीडित मॉडेलला बोलावले होते. घरी सोडताना कारमध्ये तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे मॉडेलने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

काय आहे प्रकरण?
हे प्रकरण ऑगस्ट 2018 मधील आहे. सलमान खानने तिला एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी ओशिवारामधील कॅफेटेरियामध्ये बोलावले होते. दुबईतील बॉलीवूड पार्कमध्ये परफॉर्म करण्यासाठी त्याला अनेक महिला डान्सरची आवश्यकता असल्याचे सलमाने पीडितेला सांगितले होते. घरी सोडून देण्याच्या नावाखाली त्याने कारमध्ये बसवले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.  

 

पासपोर्ट हिसकावून घेतला..
पीडितेने सलमानवर आणखी एक आरोप केला आहे. तो म्हणजे सलमानने तिचा पासपोर्ट हिसकावून घेतला आहे. तसेच पीडितेने दुबईला येण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे मजबूरीत दुबई तसेच बहरीनमध्ये त्याच्यासोबत परफॉर्म करावा लागला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...