आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खुश शक्ल भी हैं वो, यह अलग बात है मगर, हमको ज़हीन लोग हमेशा अज़ीज़ थे’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कवी, लेखक आणि शबाना यांचे पती जावेद अख्तर आपल्या सुंदर शब्दांच्या माध्यमातून दैनिक ‘दिव्य मराठी’सोबत आज साजरा करताहेत पत्नीचा वाढदिवस... आमची पहिली भेट कधी झाली हे मला आता आठवत नाही. मात्र आमच्या दोघांचा जन्म एकाच काळात झाला. मुुंबईत तेव्हा पुरोगामी लेखक होते, जसे सरदार जाफरी, कैफी आझमी, इस्मत चुगताई, कृष्णा चंद, जान निसार अख्तर, मजरूह सुल्तानपुरी, हे सर्व एकाच काळातील होते. आपण याला एका विचाराचे, एका ध्येयाचे म्हणू शकतो. हे सर्व एकमेकांच्या घरी जात, एकमेकांच्या मुलांना भेटत, त्यांचे मुलेदेखील त्यांना ओळखत होते. या विस्तारलेल्या कुटुंबामुळेच माझी आणि शबानाची पहिली भेट झाली असावी. मी कदाचित चार वर्षांचा असेल आणि ती एक वर्षाची. शबानाजीचे आई-वडील कैफी साहेब किंवा शौकत आपा यांना मी कधी पाहिले हे आठवत नाही. तसेच शबानाने मला कधी पाहिले, हे त्यांनाही आठवत नसेल. 

नाते जन्माच्या आधीचे 
आम्ही अरेंज मॅरेज करायला हवे होते, असे आम्हाला बरेच लोक म्हणतात. कारण आमची पार्श्वभूमी सारखीच आहे. माझे वडील आणि त्यांचे वडील चांगले मित्र होते. माझी आई शबानाजीच्या आईपेक्षा मोठी होती, त्यामुळे ती त्यांना छोटी बहीण समजायची. त्यामुळे आमचे नाते आमच्या जन्माआधीचे आहे, असे म्हणू शकतो. 

जावेद साहेबांच्या शेरचे झाले शीर्षक
या लेखाच्या हेडिंगमध्ये जो शेर लिहिण्यात आला आहे, या नव्या ओळी जावेद अख्तरने शबानाजी यांच्या वाढदिवसानिमित्त खास दैनिक दिव्य मराठीशी शेअर केल्या. त्यांनी याचा अर्थही सांगितला. 
तर्जुबा ( त्यांच्याच शब्दात):  शबानाजींचा चेहरा खूपच सुंदर आहे, ते आपल्या जागी योग्यच आहे, मात्र मला नेहमीच हुशार लोकांविषयी प्रेम होते.


पहिले प्रपोजल
अचानक  काहीच घडले नाही. प्रेम
हळू
हळू बहरत गेले. त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम होते. मला माहीत हाेते. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद येईना. त्यामुळे  अखेर मीच त्यांना प्रपोज केले. गुडघ्यावर बसून मी त्यांना प्रपोज केले. त्यानंतर आम्ही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत, असा विचार  मनात आला आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. 

पहिली भेट
लग्नानंतर मी त्यांना पहिल्या वाढदिवसावर पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे आता काय गिफ्ट देऊ सुचत नाही. शबानाची मुलगी नम्रता गोयलसोबत मी भेटवस्तूविषयी बोलत होतो. मला काहीच भेट वस्तू देऊ नको, असे शबानाने मला सांगितले. त्यांना दागिने आणि हिरेेदेखील आवडत नाहीत. गेल्या वर्षी घडी दिली होती. त्यामुळे आता काय करावे या गोंधळात आहे.

पहिले वचन
शबाना आणि मी लग्न करण्याच्या आणा-भाका घेतल्या तेव्हा मी तीस वर्षांचा होतो. वयाच्या या वळणावर माणूस थोडा चंचल असतो. मात्र मी शबानाला वचन दिले होते की, तुझ्याशी आयुष्यभर प्रामाणिकपणे वागेल आणि मी ते वचन आज चांगल्याप्रकारे निभावू शकलो, याचा मला अभिमान आहे.

पूर्ण एक भाग शबानाच्या नावावर...
माझा गझल आणि नज्मांचा एक संग्रह येत आहे. त्याचे नाव ‘लावा’ आहे. त्याची नवी आवृत्तीदेखील येत आहे. त्यातील एक भाग शबानाजीला समर्पित केला आहे, त्याचे नावदेखील शबाना आहे. 
त्यातील काही ओळी अशा प्रकारे...

यहां जाना, वहां जाना, इससे मिलना, उससे मिलना
हमारी जिंदगी ऐसी है जैसे रेलवे स्टेशनों पर अपने-अपने डिब्बे ढूंढते कोई मुसाफिर हों।
इन्हें कब सांस भी लेने की मोहलत है,
तभी लगता है कि तुमको मुझसे और मुझको तुमसे मिलने का ख़याल आए, कहां इतनी भी फुरसत है।
मगर जब ज़िन्दगी चलते-चलते दिल तोड़ती है तो तब मुझे तुम्हारी ज़रूरत पड़ती है।

मैत्री खूपच घनिष्ठ
मनातील एखादी गोष्ट शबानाजीला अजून सांगितली नाही, असे कधी झाले का ? असे विचारल्यावर जावेद म्हणाले..., जी गोष्ट मी त्यांच्यासमोर कधी सांगितली नाही, ती मी कधी सार्वजनिकही करणार नाही. कारण अशी कोणतीच गोष्ट नाही जी मी त्यांच्यापासून लपवली. मी या आधीही म्हणालो आणि आताही म्हणतो आहे की, आमच्या दोघांचे नाते लग्नापलीकडचे आहे.

बातम्या आणखी आहेत...