आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shabana Azmi Came Home From The Hospital After 14 Days, Wrote By Sharing A Recent Photo 'Thanks For The Prayers'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 दिवसानंतर रुग्णालयातून घरी आल्या शबाना आजमी, नुकताच काढलेला फोटो करून लिहिले - 'प्रार्थनांसाठी धन्यवाद'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुमारे दोन आठवडे मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आजमी यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्या आपल्या घरी आल्या आहेत. 69 वर्षांच्या अभिनेत्री शबाना यांनी शनिवारी ट्विटरवर त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी टीना अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे विशेष आभार मानले आहेत.  

18 जानेवारीला अपघातामध्ये जखमी झाल्या शबाना... 

18 जानेवारीला ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शबाना आजमी यांची कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापुरजवळ ट्रकला धडकली. अपघातात शबाना जखमी झाल्या आणि त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेले गेले. त्या 14 दिवस रुग्णालयात होत्या. त्यांच्या ड्रायव्हरविरुद्ध खराब ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती.