आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shabana Azmi Can Be Shifted In Normal Room Today, Husband Javed Akhtar Thanks To Well Wishers

आज नॉर्मल रूममध्ये शिफ्ट होऊ शकतात शबाना आजमी, जावेद अख्तर यांनी शुभचिंतकांचे मानले आभार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जावेद अख्तर यांच्यानुसार, अपघातात जखमी झालेल्या त्याच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आजमी यांना गुरुवारी आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केले जाईल. बुधवारी रात्री अख्तर यांनी ही माहिती ट्विटरवर शेअर केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "आमचे कुटुंब ते सर्व मित्र आणि शुभचिंतकांचे खूप खूप आभारी आहे, जे शबाना आजमी यांच्यासाठी चिंतिंत झाले आणि संदेश पाठवत राहिले. सर्वांना सांगू इच्छितो की, त्या खूप लवकर रिकव्हर होत आहेत आणि कदाचित गुरुवारी त्यांना नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केले जाईल."

18 जानेवारीपासून हॉस्पिटलमध्ये आहेत शबाना... 

शनिवारी (18 जानेवारी) शबाना आजमी यांच्या कारला अपघात झाला होता. ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापुरजवळ एका ट्रकला धडकली. या घटनेत शबाना जखमी झाल्या होत्या आणि त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेले गेले. जिथे त्या मागील 4 दिवसांपासून उपचार घेत होत्या. ड्रायव्हर विरुद्ध खराब ड्रायव्हिंगची केस दाखल केली गेली आहे.   

जावेद यांनी यापूर्वी सोमवारी एका न्यूज वेबसाइटसोबतच्या बातचीतीमध्ये शबाना यांचे हेल्थ अपडेट देत सांगितले होते, "त्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत. देवाच्या कृपेने कोणतीही इंटर्नल इंज्युरी नाही. पण त्यांच्या चेहऱ्याला खूप जखमा झाल्या होत्या." ते अभिनेत्रींचे कौतुक करत म्हणाले होते, "त्या सर्वांचा आभारी आहे, जे कठीण प्रसंगी आमच्यासोबत उभे राहिले. शबाना खूप हिंमतीच्या आहेत, वेदनेतुम मुक्त होण्यासाठी त्या लढाई स्वतः लढत आहेत."

बातम्या आणखी आहेत...