आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : अभिनेत्री शबाना आजमी यांची आई शौकत कैफी यांचे वयाच्या 90 वर्षी शुक्रवारी संध्याकाळी जुहू येथील घरी निधन झाले आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, शौकत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांनी मुलगी शबाना यांच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध शायर कैफी आजमी यांच्या पत्नीला लोक प्रेमाने शौकत आपा (ताई) म्हणायचे. शौकत यांनी मुज्जफर अलीचा चित्रपट 'उमराव जान', एमएस साथ्युचा 'गरम हवा' आणि सागर साथाडीचा चित्रपट 'बाजार' मध्ये उत्तम भूमिका साकारल्या होत्या. शौकत अखेरच्या चित्रपट 'साथिया' (2002) मध्ये दिसल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी आत्याची भूमिका साकारली होती. शौकत यांनी कैफी यांच्यासोबत मिळून इंडियन पीपुल्स थिएटर एसोसिएशन (इप्टा), प्रोग्रसिव्ह असोसिएशन आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कल्चरल विंगसाठी खूप मोठा काळ काम केले.
'कैफी और मैं' शौकत आणि कैफी यांच्या प्रेमकथेतून...
शौकत आणि कैफी यांची प्रेमकथा आणि त्यांच्या आठवणींचे पुस्तक 'कैफी और मैं' खूप प्रसिद्ध आहे. मुलगी शबानाने आपले पती जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून याचे थिएटरमध्ये प्रभावी सादरीकरण केले आहे. यामध्ये शबाना यांनी शौकत यांचे आयुष्य आणि जावेद अख्तर यांनी कैफी यांची भूमिका आपल्या शब्दात मांडली आहे.
शौकत आपा यांचे किस्से मुलगी शबाना यांच्या शब्दात...
50 रुपये आणि तुटलेली चप्पल
आई आणि पिता यांच्या आठवणी सांगताना शबाना आजमी म्हणाल्या, मागच्यावर्षी एका कार्यक्रमामध्ये 40 रुपयांचा खूप रंजक किस्सा ऐकवला. शबाना यांनी सांगितले होते की, त्यांच्या वडिलांची जी कमाई व्हायची, ते ती सर्व कम्युनिस्ट पार्टी पुढे नेण्यासाठी देऊन टाकायचे आणि आपल्याकडे खर्चासाठी केवळ 40 रुपये ठेवायचे. आमच्या शाळेची फीसच 30 रुपये लागायची. पैशांची कमतरता असायची. आईने घरचालवण्यासाठी ऑल इंडिया रेडियोमध्ये काम केले आणि नंतर पृथ्वी थिएटरसोबत काम करू लागली. मला आठवते एकदा आईला कुठेतरी टूरवर जायचे होते आणि त्यांची चप्पल तुटली. ती रागात वडिलांना म्हणाली की, नेहमी म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत. आता मी काय करू ? वडिलांनी चप्पल घेतली आणि ती लपवून घेऊन गेले. जेव्हा ते परतले तेव्हा त्यांच्या हातात शिवलेल्या चपलेबरोबर 50 रुपयेदेखील होते. आई खुश झाली आणि निघून गेली. नंतर कळाले की, वडिलांनी आईच्याच एका कार्यक्रमाच्या आयोजकांकडून तिचे पेमेंट अॅडव्हान्समध्ये आणून तिच्या हातात दिले होते.
आईच्या हातचा चहा आणि वडिलांचे शब्द...
2018 मध्ये भोपाळमध्ये 'कैफी और मैं' प्लेच्या 200 व्या शोचे ऐतिहासिक सादरीकरण झाले. यावेळी शबाना यांनी शौकत यांच्या पात्राला आवाज देत त्यांची लव्ह स्टोरी अशाप्रकारे व्यक्त केली, दररोज सकाळ होते, चिमणी चिवचिव करते. कधी आभाळ गर्जते, कधी पावसाच्या सारी बाल्कनीतून आत येतात. नेहमीप्रमाणे आमचा नोकर विनोद टेबलावर चहाचा ट्रे आणून ठेवतो. पण समोरची खुर्ची रिकामी आहे, त्यावर माझे कैफी नाहीत, जे माझ्या हाताने बनलेल्या चहाची वाट पाहात आपण अशक्त असतानाही खुर्चीवर येऊन बसायचे. आपल्या कापऱ्या हातांनी चहाचा कप घेऊन माझ्याकडे असे बघायचे जसे चहा आंही अमृत पीत आहेत. संपूर्ण दिवसात हेच क्षण माझे खूप सुंदर आणि समाधानकारक क्षण असायचे.
यासोबत कैफी यांनी एक कविता म्हणाली...
"जिंदगी नाम है कुछ लम्हों का
और उनमें भी वही एक लम्हा
जिसमें दो बोलती आंखें
चाय की प्याली से जब उठे
तो दिल में डूबे
डूबकर दिल में कहें कि
आज तुम कुछ मत कहो
आज मैं कुछ न कहूं
बस यूं ही बैठे रहें
हाथ में हाथ लिए
गम की सौगात लिए,
गर्मिए जज्बात लिए
कौन जाने कि
इसी लम्हे में दूर पर्वत पे
कहीं बर्फ पिघलने ही लगी"
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.