आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Shabash Mithu' Announced On Mithali Raj's Birthday, Says Tapasi I'm Ready To Learn Cover Drive

मिताली राजच्या वाढदिवशी झाली 'शाबाश मिथू'ची घोषणा, तापसी म्हणाली - मी कव्हर ड्राइव्ह शिकायला तयार आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः भारतीय महिला क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या मिताली राजचा  आज (3 डिसेंबर) 37 वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे याचदिवशी मिताली राजवर येत असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. शाबाश मिथू असे या चित्रपटाचे शीर्षक असून अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपटात मितालीची भूमिका वठवणार आहे.  तापसीने मितालाची वाढदिवस साजरा केला आणि या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तापसीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करणार आहेत. 

अशा दिल्या शुभेच्छा...
तापसीने मितालीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करुन लिहिले, ''हॅपी बर्थडे कॅप्टन मिताली राज. तू आम्हा सगळ्यांना अनेक बाबती गौरविले आहे. पडद्यावर तुझा हा प्रवास दाखवण्यासाठी माझी निवड झाली, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्या वाढदिवशी तुला काय भेटवस्तू देऊ, हे मला समजत नाहीये. पण मी वचन देते की #शाबाशमिथू या बायोपिकच्या माध्यमातून माझ्या रूपात स्वतःला पडद्यावर पाहिल्याने तुला अभिमान वाटेल... आणि हो मी कव्हर ड्राइव्ह शिकण्यासाठी तयार आहे.''