Home | International | Other Country | Shabby Looking Old Man Enters Super bike Showroom And Shocks Everyone

Shocking: हार्ले डेव्हिडसन बाइक शोरुममध्ये घुसला 'भिकारी'... मग सर्वांना दिला धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2018, 10:41 AM IST

अवस्था पाहून कर्मचाऱ्यांनी तो भिकारी असल्याचा अंदाज लावला. मात्र, सत्य समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

 • Shabby Looking Old Man Enters Super bike Showroom And Shocks Everyone

  इंटरनॅशनलड डेस्क - माणसाची ऐफत त्याच्या कपड्यांवरून लावली जाते असे म्हणतात. मात्र, जो जसा दिसतो तो तसाच आहे हे नेहमीच सत्य नसते. हे प्रकरण थायलंडमध्ये हार्ले डेव्हिडसन सुपरबाइकच्या शोरूमचे आहे. या शोरूममध्ये फाटलेले कपडे आणि तुटलेल्या स्लिपर चप्पलसह एक म्हातारा आला होता. त्याची अवस्था पाहून कर्मचाऱ्यांनी तो भिकारी असल्याचा अंदाज लावला. मात्र, सत्य समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

  आधी हकलले...
  नेहमीप्रमाणेच येथील कर्मचारी आपली कामे करत होते. तेवढ्यात फाटलेल्या कपड्यांमध्ये आणि पायात तुटलेली स्लिपर चप्पल घातलेला एक म्हातारा शोरुममध्ये आला. शोरुममध्ये लावलेल्या सुपर बाइक तो अगदी प्रेमाने न्याहाळत होता. बाइकला हात लावून पाहत होता. यावर कर्मचारी त्याच्या जवळ गेले आणि शोरुममधून बाहेर जाण्यास सांगितले. त्या व्यक्तीने हार्ले डेव्हिडसनची किंमत विचारली. त्याच्या प्रश्नावर सगळेच मोठ-मोठ्याने हसत होते. यावर तो चिडला आणि त्याने शोरुमच्या व्यवस्थापकाला आवाज देऊन बोलावले.


  खिशातून काढले 12 लाख रुपये...
  यानंतर आलेल्या व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱ्याला आप-आपल्या जागी परत जाण्यास सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने मॅनेजरला पुन्हा बाइकची किंमत विचारली. मॅनेजरने त्याला बाइक दाखवली आणि त्याची किंमत 12 लाख असल्याचे सांगितले. किंमत ऐकल्यानंतर त्याने आपल्या खिशात हात घातला आणि 12 लाख रुपये बाहेर काढून मॅनेजरच्या हातात ठेवले. हे दृश्य त्याला हकलण्याचा प्रयत्न करणारे कर्मचारी डोळे मोठे करून पाहत होते. त्यांचे आश्चर्याने उघडलेले तोंड बंदच होत नव्हते. मॅनेजरला पैसे देऊन त्याने चावी घेतली आणि बाइकला लावून हसतमुखाने शोरुममधून निघून गेला.


  बाइकसाठी आयुष्यभर गोळा केली ही रक्कम...
  या व्यक्तीचे नाव लंग डेचा आहे. तो एक रिटायर्ड मेकॅनिक आहे. हार्ले डेव्हिडसन त्याची ड्रीम बाइक होती आणि ती घेण्यासाठी त्याने आयुष्यभर पैसे गोळा केले होते. ही बाइक त्याने मे महिन्यात खरेदी केली. प्रकरण सुद्धा तेव्हाचेच आहे. पण, सोशल मीडियावर सध्या ती घटना व्हायरल होत आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी काही व्हायरल फोटोज...

 • Shabby Looking Old Man Enters Super bike Showroom And Shocks Everyone
 • Shabby Looking Old Man Enters Super bike Showroom And Shocks Everyone

Trending