आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shadab Gang Criminals Arrested By Police After They Fired Bullets At Police, Looted Businessman And Put His Car On Fire In Bhopal Madhya Pradesh

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धुडगूस घालत होते कुख्यात गुंड; पोलिसांवर झाडल्या गोळ्या.. अनेक गाड्या पेटविल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये आचारसंहिता लागू असताना मंगळवारी सकाळी 6 ते रात्री अकरापर्यंत 6 कुख्यात गुंडांनी दहशत पसरविल्याची घटना समोर आली. गुंडांनी तब्बल 16 तास धुडगूस घालत अनेक वाहने जाळली तर दोन पोलिस कर्मचार्‍यांवर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी टीटीनगर पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. परंतु पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

पोलिासांकडून रात्रभर सुरू असलेल्या शोध मोहिमेत सर्व गुंडांना अटक करण्यात आली आहे. शादाब उर्फ जहरीला (वय33) हा या टोळीचा मोहरक्या आहे. शहरात गुंड दहशत पसरवित असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याची टीका होत आहे.

 

गुंडांनी माझ्या नव्या गाडीच्या काचा फोडून आग लावली- पीडित व्यापारी

> व्यापारी विवेक कोहली यांनी सांगितले की, ते रात्री 10:15 वाजता जवाहर चौकातील गुरुद्वाराजवळ दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी अचानक एका मोटरसायकवर तीन गुंड आले आणि त्यांची गाडी अडवली. काही विचारण्याअगोदरच त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि गाडीला आग लावली. आरडा-ओरड केल्यानंतर गुंडांनी तिथून पळ काढला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तीन गुंडांपैकी एकाचे नाव शादाब असून तो त्या टोळीचा मोहरक्या होता. याप्रकर कोहली यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे.

 

गोळी कानाजवळून गेली

> पोलिस कॉन्स्टेबल नारायण शर्मा यांनी सांगितले, काही गुंड शस्त्र बाळगून टीटी नगर पोलिस स्टेशनच्या मागे दिसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन पोलिस गुंडाच्या मागावर रवाना झाले. परंतु एक मोठा स्फोट झाला. गुंडांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी कानाच्या जवळून गेल्याचे शर्मा यांनी सांगितले. नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक  बोलविण्यात आली. परंतु ति‍तक्यात शादाब आणि त्याचे साथीदार पसार झाले होते.

 

पोलिस कॉन्स्टेबलसोबत गुंड पित होते दारु

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस शादाब आणि त्याच्या साथिदारांचा शोध घेत असताना त्यापैकी दोन गुंड पोलिस कॉन्स्टेबलसोबत टीटीनगर परिसरात दारु पित होते. या घटनेमुळे पोलिसांच्या कारवाईवर दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची इनपुट न मिळाल्याचे कारण सांगितले. गुंडांच्या टोळीला पकडल्यानंतर त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे, एक तलवार आणि एक मोटरसायल जप्त करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...