Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Shadoo's 100 murti are available

शाडूच्या १०० मूर्ती करणार उपलब्ध, बाप्पासाठी स्वखुशीने द्या रक्कम

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:10 AM IST

ओ पाचशे रुपयांची मूर्ती असते का? चारशेला द्या. कमी करा की काय तर... असा संवाद गणेशमूर्तीच्या बाबत होऊ नये यासाठी एक युवक

  • Shadoo's 100 murti are available

    सोलापूर- ओ पाचशे रुपयांची मूर्ती असते का? चारशेला द्या. कमी करा की काय तर... असा संवाद गणेशमूर्तीच्या बाबत होऊ नये यासाठी एक युवक पुढे सरसावला आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्ती मुळात महाग असतात. त्या उपलब्धही होत नाहीत. म्हणूनच यंदा मिलिंद माईनकर हे १०० इकोफ्रेंडली गणेश मूर्ती उपलब्ध करणार आहेत. त्याची किंमत न लावता स्वखुशीने देणगी स्वरूपात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे अनोखे आवाहन ते करत आहेत.


    गणेशाच्या मूर्तीचे भाव न सांगता या मूर्ती स्वखुशीने घेऊन भक्तिभावाने व श्रद्धेने प्रतिष्ठापना करा, असा संदेश ते आपल्या कृतीतून देत आहेत. हा उपक्रम ते गेल्या चार वर्षांपासून राबवत होते. मात्र, मागील तीन वर्षे पीओपी मूर्ती होत्या. यंदा प्रथमच इकोफ्रेंडली गणेशमूर्ती उपलब्ध करत आहेत. माईनकर हेे मूर्तिकार नाहीत. पण सामाजिक उपक्रमातील सहभागासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. श्रीकांत माईनकर, अंजली माईनकर, मिलिंद माईनकर, तृप्ती माईनकर हे संपूर्ण कुटुंब गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमात कृतीद्वारे सहभागी होते. होटगी रोड येथील महिला हॉस्पिटलच्या मागे बंगल्यात हा उपक्रम यंदा ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सहा इंच ते एक फुटापर्यंतच्या या इकोफ्रेंडली घरगुती मूर्ती आहेत. तसेच बुकिंग करून ठेवण्याची सोय आहे. स्वखुशीने रक्कम हुंडीत जमा करा, इको फ्रेंडली बाप्पा विराजमान करा, असा संदेश देत आहेत. संपर्कासाठी ७७४३८९२०५९ असा क्रमांक आहे.


    यूथ फोर डेव्हलपमेंट संघटना सरसावली
    यूथ फोर डेव्हलपमेंटतर्फे १०० इकोफ्रेंडली मूर्ती हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संघटनेचे प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. हिंदूराव गोरे, रोहित जक्कापुरे, प्रज्ञा पाटील, वीरेश माने, नितीन बाणेगाव, प्रतीक भडकुंभे, स्नेहा सिंदगी, सतीश आनंद, मिलिंद माईनकर, राकेश टेळे आदी प्रयत्नशील आहेत.

Trending