आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shafi Qureshi Of Gandhinagar Bhopal Accused Of Minor Girls Molestation Beaten By Locals And Arrested

5 वर्षांची मुलगी आईला म्हणाली-ते अंकल दीदीबरोबर काहीतरी करतात, महिलेने प्लान बनवत सर्वकाही पाहिले आणि रंगेहाथ पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - गांधीनगर पोलिसांनी 7 आणि 5 वर्षांच्या चिमुरड्या मुलींबरोबर अश्लिल वर्तन करणाऱ्या एका इंजिनीअरींगच्या  विद्यार्थ्याला अटक केली आहे. तो अश्लिल चित्रपट पाहून अनेक दिवसांपासून मुलीबरोबर असे कृत्य करत होता. लहान मुलीकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर महिलेला त्याला रंगेहाथ पकडायचे होते. महिलेने त्याचे कृत्य पाहिल्यानंतर लोकांना बोलावले, लोकांनी त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. 


मुलगी ओरडल्याने धावली आहे, तेव्हा तो करत होता अश्लिल कृत्य.. 
सीएसपी लोकेश सिन्हा यांच्या मते, दोन्ही मुली आई वडिलांसोबत राहतात. जवळच्याच एका शाळेत या मुली शिकायला जातात. जवळपास दहा दिवसांपूर्वी पाच वर्षीय चिमुरडीने तिच्या आईला अब्बास नगरचा रहिवासी असलेल्या 19 वर्षीय शफी कुरेशीच्या कृत्याबाबत सांगितले. ती म्हणाली-दीदीबरोबर शफीने अशे केले. महिलेने पतीला याबाबत सांगितले आणि शफीला रंगेहाथ पकडण्याचा प्लान केला. त्यानंतर ते शफीवर नजर ठेवू लागले. 


मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजता मुलगी दिसत नव्हती. आईने तिला आवाज दिला तेव्हा मुलीने आरडा ओरडा करत आईची मदत मागितली. महिला मुलीकडे पळाली तर शफी तिच्याबरोबर अश्लिल कृत्य करत असल्याचे दिसले. ते पाहताच महिलेने त्या भागातील लोकांना बोलावले आणि लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 19 वर्षीय शफी इंजिनीअरींग सेकंड इअरचा विद्यार्थी आहे. त्याने मोबाईल फोनवर अश्लिल चित्रपट पाहत हे कृत्य केले होते. 

बातम्या आणखी आहेत...