आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shafi Qureshi Of Gandhinagar Bhopal Accused Of Minor Girls Molestation Beaten By Locals And Arrested

5 वर्षांची मुलगी म्हणाली - आई! ते अंकल दीदीसोबत काही तरी करतात, महिलेने प्लान बनवून असा दिला चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ. गांधी नगर पोलिसांनी 7 आणि 5 वर्षांच्या चिमुरडींसोबत अश्लील चाळे करणा-या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. ही व्यक्ती चित्रपट पाहून मुलींसोबत अनेक दिवसांपासून अश्लील चाळे करत होती. लहान मुलीने त्याचे चाळे सांगितल्यानंतर आईने त्याला रंगेहात पकडले. यावेळी आईने हे सर्व स्वतःच्या नजरेने पाहिले. यावेळी या व्यक्तीला लोकांनी जमून चोप दिला. यानंतर त्याला गांधी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

 

मुलीचा आवाज ऐकूण आई धावली, नराधम करत होता अश्लील चाळे 
- सीएसपी लोकेश सिन्हाने सांगितले की, या दोन्ही मुली आई-वडिलांसोबत या परिसरात राहतात. या दोन्ही मुली जवळच्याच एका शाळेत शिक्षण घेतात. दहा दिवसांपुर्वीच पाच वर्षांच्या मुलीने ही सर्व हकीकत आईला सांगितली होती. तिने सांगितले की, येथेच राहणारा 19 वर्षीय शफी कुरैशी अश्लील चाळे करतो. ती म्हणाली की, - दीदीसोबत शफीने असे केले. महिलेने हे सर्व पतीला सांगितले आणि त्याला रंगेहात पकडण्याचा प्लान केला. कुटूबाने शफीवर नजर ठेवली. 

- मंगळवारी दुपारी जवळपास एक वाजता एक मुलगी दिसत नव्हती. आईने तिला आवाज दिला. तर मुलगी ओरडून मदत मागू लागली. यावेळी महिला मुलीकडे पळाली, तेव्हा शफी तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. हे पासून महिलेने आरडाओरडा केला आणि लोकांना बोलावले. लोकांनी मिळून शफीला पकडले आणि त्याला चोप दिला.
- सीएसपीने सांगितले की, नरसिंहगढ येथे राहणारा 19 वर्षीय मोहम्मद शफी कुरैशी आरकेडीएफ कॉलेजमध्ये पीई सेकंड ईयरचा विद्यार्थी आहे. तो अब्बास नगरमध्ये भाड्याने राहतो. मोबाइल फोनवर अश्लील फिल्म पाहून त्याने हे केले. त्याचे वडील शफीक टीचर आहेत.

बातम्या आणखी आहेत...