आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी आपल्या २१ सदस्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. त्यातील किमान १२ सदस्य माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या सरकारमध्ये मुख्य पदांवर होते. मंत्रिमंडळात तीन महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्रिमंडळाचा सोमवारी राष्ट्रपती भवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रवक्ता फवाद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या २१ सदस्यांपैकी १६ मंत्री आणि ५ सल्लागार असतील. पीटीआयचे उपाध्यक्ष शाह मोहंमद कुरेशी हे देशाचे नवे परराष्ट्रमंत्री असतील. ते २००८ ते २०११ पर्यंत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमध्येही या पदावर होते. त्यांच्याच कार्यकाळादरम्यान २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी कुरेशी दिल्लीत होते. परवेझ खट्टक यांच्याकडे संरक्षण तर शेख राशिद यांच्याकडे रेल्वे मंत्रालय असेल. असद उमर अर्थमंत्री असतील. तीन महिला मंत्र्यांत शिरीन मजारी, जुबैदा जलाल आणि फेहमिदा मज्रिया यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या नॅशनल असेम्ब्ली आणि सिनेटच्या सदस्य संख्येच्या ११ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा नियम पाकिस्तानच्या राज्यघटनेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.