आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Kha And Akshay Kumar: Shah Rukh Khan Reveals Why He Can Work With Akshay Kumar

अक्षय कुमारसोबत काम करु शकत नाही शाहरुख खान, स्वतः सांगितले याचे मोठे कारण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. शाहरुख खान आणि अक्षय कुमारने 1997 मध्ये पहिल्यांदा 'दिल तो पागल है' मध्ये एकत्र काम केले होते. यानंतर अक्षयच्या 'हे बेबी'(2007)मध्ये शाहरुखने आणि शाहरुखच्या 'ओम शांती ओम'(2007) मध्ये अक्षयने स्पेशल अपीयरेंस दिला होता. पण दोघंही फुल-फ्लॅश रोलमध्ये एकमेकांसोबत दिसले नाही. शाहरुखने मुलाखतीत याचे कारणही सांगितले आहे. 


शाहरुख म्हणाला - अक्षय जेव्हा उठतो, ती माझी झोपण्याची वेळ असते 
- शाहरुख खानने हसत हसत अक्षयसोबत काम न करण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, "मी याविषयी काय बोलू? मी त्याच्यासारखा लवकर उठत नाही. अक्षय सकाळी लवकर उठतो, तेव्हा मी झोपायला जातो. तो सकाळी लवकर आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मी काम सुरु करतो तेव्हा तो पॅकअप करुन घरी परतत असतो. तो रात्री उशीरा काम करत नाही. मी निशाचर आहे. माझ्यासारखी रात्री शूटिंग करणे जास्त लोकांना आवडत नाही."

 

अक्षयसोबत काम करणे मजेदार असेल : शाहरुख 
- शाहरुख पुढे म्हणाला की, जर त्यांनी एकत्र काम केले तर सेटवर त्यांची कधीच भेट होणार नाही. शाहरुख म्हणाला, "अक्षयसोबत काम करणे खुप मजेदार असेल. दोघं सेटवरच भेटणार नाही. तो जात असेल तेव्हा मी येत असेल. मला अक्षयसोबत काम करायला आवडेल, पण आमचे टायमिंग मॅच होणार नाही."

 

वर्षातून तीन-चार चित्रपट करतो अक्षय 
- कामाविषयी बोलायचे झाले तर शाहरुख खान वर्षात एक किंवा दोन चित्रपट करतो. तर अक्षय तीन-चार चित्रपट एकाच वर्षात रिलीज होतात. आता 2018 हे वर्ष पाहा. शाहरुखचा फक्त 'झिरो' रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. तर अक्षयच्या तीन चित्रपट 'पॅडमॅन', 'गोल्ड' आणि '2.0' ने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. 2019 मध्ये अक्षयचे पाच चित्रपट आहेत. यामध्ये 'केसरी', 'मिशन मंगल', 'गुड न्यूज', 'हाउसफुल 4' आणि 'सूर्यवंशी' रिलीज होऊ शकतो. शाहरुखजवळ सध्या कोणतेही काम नाही. 

बातम्या आणखी आहेत...