आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Anni: शाहरुख-गौरी दोनदा अडकले लग्नगाठीत, हेमा मालिनींमुळे सेटवरच घालवावी लागली होती लग्नानंतरची पहिली रात्र, फिल्मी आहे लव्ह स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाचा आज 28 वा वाढदिवस आहे. 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांचे लग्न झाले होते. शाहरुखच्या यशामागे त्याची पत्नी गौरी खानचा मोठा वाटा आहे. अनेकदा शाहरुखने हे बोलूनदेखील दाखवले आहे.  या दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाहीये. वेगवेगळ्या धर्माचे असलेल्या शाहरुख-गौरीने केवळ एकमेकांचा स्वीकारच केला नाही, तर हे दोघे आज बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत.

 

पहिल्या नजरेतील प्रेम... 
शाहरुख खान आणि गौरीची भेट शालेय जीवनात एका पार्टीत झाली होती. त्या पार्टीत शाहरुखने गौरीला एका मुलासोबत डान्स करताना पाहिले होते. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखचे लव्ह अॅट फस्ट साइट होते. शाहरुख-गौरीची पहिली भेट झाली तेव्हा तो 19 वर्षांचा तर गौरी 14 वर्षांची होती. शाहरुखने पार्टीत गौरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गौरीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. 25 ऑक्टोबर 1984 रोजी झालेल्या तिस-या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला. सुरुवातीला गौरीला इम्प्रेस करण्यासाठी शाहरुख तिच्यासाठी गाणे म्हणायचा. त्या गाण्याचे बोल होते, "गोरी तेरा गांव बड़ा प्यारा मैं तो गया मारा....". किंग ऑफ रोमान्सने हार न मानता गौरीला आपल्या प्रेमात पाडले आणि त्यांचे अफेअर सुरु झाले.

 

कोडवर्डमध्ये व्हायचे बोलणे...
शाहरुख पहिल्याच नजरेत गौरीच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी शाहरुखने एक उपाय शोधून काढला. तो आपल्या एखाद्या मैत्रिणीला गौरीच्या घरी फोन करायला सांगायचा. गौरीच्या घरी जो कुणी फोन उचालयाच, त्याला ती मैत्रीण आपले नाव शाहीन सांगायची. शाहीन हा कोडवर्ड ऐकून शाहरुखचा फोन असल्याचे गौरीला समजायचे. गौरीच्या घरी कुणाला शंका यायची नाही आणि बराच वेळ या दोघांचे बोलणे व्हायचे. गौरी आणि शाहरुखची भेट पार्टीजमध्ये अधिक व्हायची. हळूहळू हे दोघे लाँग ड्राइव्हवर जाऊ लागले. 

 

कसे केले होते शाहरुखने गौरीला प्रपोज?
मुश्ताक शेख लिखीत शाहरुखच्या बायोग्राफीत शाहरुखने आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले होते, "एकेदिवशी मी गौरीला सोडायला तिच्या घरी गेलो होतो. गौरी गाडीवरुन उतरल्यानंतर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे मी तिला म्हटले आणि तिचे उत्तर न ऐकताच तिथून निघून गेले होतो."

 

पजेसिव्ह शाहरुखला कंटाळली होती गौरी...  
शाहरुख गौरीविषयी खूपच पजेझिव्ह होता. जर गौरीने आपले केस जरी मोकळे ठेवले तरीदेखील तो तिच्याशी भांडायचा. शाहरुखच्या या सवयीला कंटाळून एकेदिवशी गौरी कुणालाही न सांगता दिल्लीहून मुंबईत आली होती. शाहरुख गौरीची समजूत घालण्यासाठी तिच्या शोधात मुंबईत आला. मात्र मुंबईत गौरी कुठे आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण त्याने अनेक दिवस तिचा शोध घेतला. एकेदिवशी मुंबईतील अक्सा बीचवर शाहरुखला गौरी भेटली. त्याला बघताच तिला रडू कोसळले होते.

 

दोनदा झाले लग्न... 
शाहरुख आणि गौरी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करु इच्छित होते, मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकी नऊ आले होते. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवले. 26 ऑगस्ट 1991 रोजी शाहरुख आणि गौरीचे कोर्टात लग्न झाले. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचे नाव आयशा ठेवण्यात आले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या संगीत कार्यक्रमात या दोघांनी एकत्र डान्सदेखील केला होता.

 

हेमा यांचा वाट पाहण्यात संपली रात्र.. 

शाहरुख आणि गौरीचे जेव्हा लग्न झाले होते, तेव्हा हेमा मालिनी यांनी शाहरुखला फोन करून म्हटले होते की, त्याची इच्छा असेल तर तो शुटिंगसाठी येऊ शकतो. शाहरुख हे ऐकूण खुश होता की, हेमा मालिनींना भेटणे हा गौरीसाठीही खास क्षण असेल. गौरीही त्यासाठी एक्साइटेड होती. शाहरुख गौरीला घेऊन स्टुडियोत आला. पण हेमा मालिनी दिसल्या नाहीत. असिस्टंट डायरेक्टर्स होते. ते म्हणाले, त्या थोड्या वेळात येतील. शाहरुख आणि गौरीला एका स्टुडिओत बसून हेमा मालिनी यांची वाट पाहत होते.  रात्री सुमारे 11 वाजता शाहरुख गौरीला मेकअप रूममध्येच सोडून शुटिंगसाठी गेला. सुमारे दोन वाजेपर्यंत शुटिंग सुरू होते. पण हेमा मालिनी आल्या नव्हत्या. थकलेला शाहरुख मेकअप रूममध्ये परत आला तेव्हा त्याने साडी आणि दागिणींच्या ओझ्याने थकून गौरी एका लोखंडी खुर्चीवरच झोपलेली त्याला दिसली. शाहरुखला तेव्हा फार वाईट वाटले होते. पण तो त्याचा स्ट्रगलचा काळ होता, त्यामुळे तो काही बोलूही शकत नव्हता. शाहरुख खानला हेमा मालिनी यांनी त्यांच्या दिग्दर्शानत आणि निर्मितीत तयार होणार्या 'दिल आशना है' साठी साइन केले होते. लग्नाच्या रात्री याच चित्रपटाचे शुटिंग सुरू होते.

 

आर्यनच्या जन्मापूर्वी झाले होते गौरीचे मिसकॅरेज
शाहरुखने मुलाखतीत मुलांच्या बाबतही सांगितले. तो म्हणाला, माझी तीन मुले आहेत आणि तिघांची एक खास स्टोरी आहे. त्यामुळे तिघेही माझ्यासाठी खास आहेत. आर्यनच्या जन्मापूर्वी गौरीचे मिसकॅरेज झाले. आर्यनचा जन्म झाला त्यावेळीही दिवस फार कठीण परिस्थितीत गेले होते.  सुहानाचा जन्म आमच्यासाठी जास्त आनंददायी होता. कारण पहिल्या वेळी आम्हाला मुलगी हवी होती, पण ती दुसऱ्या वेळी मिळाली. मुले माझ्यासारखी दिसावीत असे गौरीला वाटायचे. म्हणून ती डिलिव्हरीनंतर विचारायची की, बाळ तुझ्यासारखे दिसते का. अनेक वर्षांनी आम्हाला तिसरे बाळ हवे असे वाटले, तेव्हा आम्ही अबरामचे प्लानिंग केले.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुख-गौरीचे Wedding Photos...

बातम्या आणखी आहेत...