आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरचे लग्न / 15 नोव्हेंबरला इटलीत पोहोचू शकतात शाहरुख खान, संजय लीला भन्साळींसह हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः इटलीतील लेक कोमो येथे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोेण यांचे 14 नोव्हेंबर रोजी कोकणी पद्धतीने लग्न लागले. त्यांच्या लग्नात निवडक 40 पाहुणे सहभागी झाले आहेत. बातम्यांनुसार, या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील एकाही सेलिब्रिटीच्या नावाचा समावेश नाही. पण फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, शाहरुख खान, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा आणि फराह खान लग्नात सहभागी होण्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. हे सेलेब्स 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने होणा-या लग्नात सहभागी होणार आहेत.

 

28 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार रिसेप्शन: दीिपका आणि रणवीर यांनी इटलीत होणा-या त्यांच्या लग्नाला निवडक लोकांना आमंत्रित केले आहे. पण 21 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर रोजी होणा-या रिसेप्शन पार्टीत ते नातेवाईक आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरु तर 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी पार पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...