आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Can Do 'Jolly LLB3' With Subhash Kapoor, Their Discussion Over This Have Begun

'जॉली एलएलबी 3' साठी होत आहे शाहरुखच्या नावाची चर्चा, दिग्दर्शक सुभाष कपूरसोबत बोलणी सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सुभाष कपूरच्या प्रकरणात आमिर खानच्या पावलानंतर मोठा परिणाम दिसून येत आहे. सूत्रांनी सांगितले, आमिरनंतर आता सुभाषला शाहरुख खानचीही साथ मिळणार आहे. सुभाषच्या हिट फ्रँचायझी 'जॉली एलएलबी'च्या पुढच्या भागात शाहरुखने रस घेतल्याचे ऐकले आहे. या फ्रँचायझीच्या पुढील भागासाठी ते शाहरुखला अप्रोच करणार आहेत. याविषयी दोघांची बैठकही झाली आहे. सुभाषने गेल्या दीड वर्षाच्या कामातून ब्रेक घेत 'जॉली एलएलबी' फ्रँचायझीच्या पुढच्या कथेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

वर्षभरानंतर सुरू होईल 'मोगुल'
सुभाषच्या 'मोगुल'ला सुरू होण्यास अजून एक वर्षाहून जास्त काळ लागणार असल्याचे व्यापारी पंडितांनी सांगितले. कारण 'फॉरेस्ट गंप'च्या तयारी आणि शूटसाठी आमिरलाही तितकाच वेळ लागणार आहे. त्याच वेळी, अक्षयकुमार जो त्याच्या तिसऱ्या भागात या फ्रँचायझीमध्ये होता याबद्दल अजून संभ्रमात आहे. तारखांमध्ये त्याला अडचण येत आहे. त्यातच तो 'बच्चन पांडे' आणि त्यानंतर 'पृथ्वीराज चौहान' च्या शूटिंगमध्ये व्यग्र होणार अाहे. त्यामुळे ही यशस्वी फ्रँचायझी अधिक मोठी करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी शाहरुखकडे संपर्क साधला आहे.

वकिलाची भूमिका कधीच साकारली नाही
शाहरुखच्या जवळच्या मित्रांनुसार, तो आता अशा पात्राचा शोधात आहे, जे यापूर्वी त्याने कधीच साकारले नाही. 'जॉली ...' फ्रँचायझी कोर्टावर आधारित आहे. विनोदी असण्याबरोबरच त्यातून गंभीर मुद्द्यांनाही हात घातला आहे. योगायोग म्हणजे शाहरुखने आपल्या कारकीर्दीत कधीही वकिलाची भूमिका साकारली नाही. परिणामी, तो या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवू शकताे.

शाहरुखशी निगडित सूत्रांनी सांगितले की, एकावेळी एकच चित्रपट करण्याचा आपला प्रणही मोडू शकतो. त्यामुळे यंदा शाहरुख एकत्र दोन चित्रपटांवर काम करू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे अनुराग कश्यप, तिग्मांशू धुलिया आणि सुभाष कपूरपैकी तो कोणत्या दिग्दर्शकाला निवडतो हे पाहणे मजेदार ठरेल.

बातम्या आणखी आहेत...