• Home
  • Gossip
  • Shah Rukh Khan dances with Dwayne Bravo on 'Lungi Dance' song, video going viral

Bollywood / शाहरुख खानने ड्वेन ब्रावोसोबत केला 'लुंगी डान्स', वेगाने व्हायरल होत आहे व्हिडीओ 

हा व्हिडीओ शाहरुखच्या फॅन क्लबने ट्विटरवर शेअर केला आहे

दिव्य मराठी वेब

Sep 09,2019 03:01:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानची अभिनयासोबतच स्पोर्ट्समध्येदेखील रुची आहे. शाहरुख खानने दोन क्रिकेट टीम खरेदी केल्या आहेत. 'कोलकाता नाइट राइयडर्स' ही त्याची क्रिकेट टीम भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळते. तर दुसरी टीम 'ट्रिनबागो नाइट रायडर्स' कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळते. अशातच 'ट्रिनबागो नाइट रायडर्स' ने तीन मोठ्या मॅचेस जिंकल्या आहेत. हा विजय साजरा करण्यासाठी शाहरुख आणि त्याची टीम क्रूजवर एन्जॉय करताना दिसली. अशातच पार्टीदरम्यानचा एक व्हडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान ड्वेन ब्रावोसोबत आपले गाणे 'लुंगी डान्स' वर नाचत आहे. शाहरुख खानचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लबने ट्विटरवर शेअर केला आहे.

X
COMMENT