आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेशात उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्या पारसी नववर्षारंभाची सुटी असल्याने अतिरिक्त जाहीर करण्यात आलेली नाही. राजकारणी नेत्यासोबतच वाजपेयी एक प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार होते. 'क्या खोया क्या पाया जग में' ही त्यांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक कविता आहे. वाजपेयींच्या या कवितेवर 2002 मध्ये एक अल्बम प्रकाशित झाला होता. हा अल्बम शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आला होता. जगजित सिंह यांनी हा अल्बम स्वरबद्ध केला होता.
अल्बमच्या लाँचला जेव्हा शाहरुख खानने उडवली होती वाजपेयींची खिल्ली...
- या अल्बमचे नाव 'संवेदना' आहे. याच्या प्रकाशनाला शाहरुख खान, अटल बिहारी वाजपेयी, यश चोप्रा, जावेद अख्तरसह संपूर्ण टीम पोहोचली होती.
- अल्बमच्या प्रकाशनानंतर जेव्हा शाहरुखला मंचावर स्पीच देण्यासाठी बोलावण्यात आले, त्यावेळी तो वाजपेयींची फिरकी घेताना दिसला होता.
- यावेळी शाहरुख म्हणाला होता, "आपल्या देशात कलेचा आदर नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होते. कारण आमचे एवढ्या चांगले आर्टिस्ट, कवींना (वाजपेयी) पंतप्रधान बनवण्यात आले."
- शाहरुख पुढे म्हणाला होता, "खरंच माझ्या म्हणण्याचा अर्थ मी वाजपेयींच्याच कवितेतून सांगतो, इश्क ने गालिब निकम्मा कर दिया वरना, हम आदमी थे
काम के... बस... वाजपेयी साहेबांवर हे तंतोतंत लागू पडतं. राजकारणाने त्यांना निरुपयोगी बनवले, खरंच..."
- वाजपेयी यांनी आपल्या साहित्यिक जीवनात 'क्या खोया क्या पाया जग में' कवितेव्यतिरिक्त 'मौत से ठन गई', 'मैं न चुप हूं न गाता हूं' आणि 'राह कौन सी जाऊं मैं' यांसारख्या गाजलेल्या कविता लिहिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.