आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्यावर उपचार घेत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांना भेटण्यासाठी तिथे जात आहेत. नुकताच शाहरुख खानही ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचला. यावेळी शाहरुखसोबत लेक सुहाना आणि पत्नी गौरीही होती. शाहरुखला भेटल्यानंतर ऋषी कपूर इमोशनल झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखच्या कुटूंबाचे आभार मानले. यासोबतच ऋषी कपूर म्हणाले की, शाहरुख खुप दयाळू आणि उदार आहे. शाहरुख सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि त्याने या दरम्यान स्टर्न स्कूलमध्ये मुलांची भेट घेतली.
ऋषी कपूर यांना पाहण्यासाठी पोहोचले अनेक सेलेब्स
- ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रियांका चोप्रा, अनुपम खेर, जावेद अख्तर आणि सोनाली बेंद्रे गेल्या होत्या.
- ऋषी कपूर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते डायरेक्टर लीना यादवच्या 'राजमा चावल'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा एका वयस्कर वडिलांची आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःपासून दूर झालेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करतात. यापुर्वी ऋषी कपूर 'मुल्क' चित्रपटात दिसले होते. अनुभव सिन्हाच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात त्यांनी मुराद अलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांच्यासोबत तापसी पन्नू आणि आशुतोष राणा होते.
दिड महिन्यांपासून उपचार घेत आहेत ऋषी कपूर
ऋषी कपूरने 29 सप्टेंबरला ट्वीट करुन ते अमेरिकेत जात आहे असे सांगितले होते. ते म्हणाले होते की, "मी कामामधून काही काळ ब्रेक घेऊन ट्रीटमेंटसाठी अमेरिकेत जात आहे. लोकांनी काळजी करु नये आणि काहीही अंदाज लावू नये असे मला वाटते. मी गेल्या 45 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. तुम्हा लोकांच्या प्रार्थनांनी लवकरच परत येईल."
ऋषी कपूरची लेक रिध्दिमाने काही दिवसांपुर्वीच वडिलांच्या आरोग्याविषयी अपडेट सांगितल्या. एका लीडिंग न्यूजपेपरला दिलेल्या मुलाखतीत रिध्दिमाने सांगितले होते की - पापा पुर्णपणे ठिक आहेत, काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तसेही पापाविषयी मला कसलीही काळजी नव्हती, ते लवकर बरे होणार हे माझ्या मनाला माहित होते. ते आपले रुटीन चेकअप करत आहेत. सध्या सर्व ठिक आहे, पुढेही सर्व काही चांगले होईल अशी आशा आहे. तर नीतू कपूरनेही अमेरिकेतून ऋषीसोबतचा एक फोटो शेअर केला होता, यामध्ये ते हसताना दिसत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.