आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan To Announce His Upcoming Movie Soon, Meeting With Malayalam Filmmaker Abu Ashiq

शाहरुख खान लवकरच करू शकतो चित्रपटाची घोषणा, मल्याळम फिल्ममेकर अबु आशिक याची घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 2018 चा चित्रपट 'झिरो' मध्ये शेवटचा दिसलेला शाहरुख खान लवकरच मल्याळम फिल्ममेकर आशिक अबुसोबत दिसू शकतो. एका इंग्रजी वेबसाइटनुसार दिग्दर्शक आशिकने मन्नत येथे जाऊन शाहरुखची भेट घेतली आहे. सांगितले जात आहे की, चित्रपटाचे स्क्रिप्टिंग श्याम पुषकरण करणार
आहे. मल्याळी दिग्दर्शकाने मेडिकल थ्रिलर 'व्हायरस' यांसारखे हिट चित्रपट बनवले आहेत. 

किंग खानचे निवासस्थान मन्नत येथे पोहोचलेल्या अबुने टीमसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करून लिहिले, 'वी लव्ह यू एसआरके.' त्याच्यासोबत स्क्रिप्ट रायटर श्याम पुषकरणदेखील दिसला. या सर्वांच्या या भेटीनंतर असा अंदाज लावला जात आहे की, शाहरुख लवकरच चित्रपटाची घोषणा करू शकतो. मीटिंगदरम्यान उपस्थित असलेला निर्माता शानीम जायदनेही एक ग्रुप फोटो शेअर केला. शानीमने लिहिले, 'शाहरुख खान, श्याम पुषकरण आणि आशिक अबु यांच्यासोबत दोन तासांची उत्तम भेट.'  

यापूर्वीही बातमी आली होती की, शाहरुख बॉलिवूडचे हिट फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांच्या प्रोजेक्टचा भाग बनणार आहे. मात्र किंग खानकौन याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. अभिनेता यापूर्वी अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'झिरो' चित्रपटात दिसला होता. 'झिरो' चित्रपट प्रेक्षकांमध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. 

बातम्या आणखी आहेत...