आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शुक्रवारी निधन झाले. अटलजींनी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपुर्ण देशावर शोककळा पसरली आहे. शाहरुखनेही अटलजी यांना श्रध्दांजली दिली. शाहरुखने 16 ऑगस्टच्या रात्री आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिले आहे. यासोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.
अटलजींना बापजी म्हणायचे शाहरुख
SRK ने लिहिले, 'जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा माझे वडील मला दिल्लीमध्ये वाजपेयींचे भाषण ऐकण्यासाठी घेऊन जात होते. वेळेसोबतच मला त्यांना भेटण्याच्या अनेक संधी मिळाल्या. आम्ही नेहमीच कविता, फिल्म्स, पॉलिटिक्सवर चर्चा करायचो. मला त्यांच्या अनेक कविता ऑनस्क्रीन वाचण्याची संधी मिळाली. आमच्या घरी त्यांना बापजी म्हणून संबोधित केले जात होते.'
- आज देशाने पितृ तुल्य व्यक्त आणि महान नेता गमावला आहे. वयक्तिकरित्या मी बालपणीच्या आठवणींचा एक महत्त्वाचा भाग गमावला आहे. मी स्वतःला खुप नशिबवान समजतो की, माझ्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांच्या कुटूंब, मित्रांसोबत माझ्या संवेदना व्यक्त करतो. आम्ही तुमचा हसता चेहरा नेहमी मिस करु बापजी.
प्रियांका आणि रजनीकांतनेही केले ट्वीट, पाहा पुढील स्लाइडवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.