आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukhkhan Wife Gouri Khan Ridiculously Expensive Things: Gouri No. 1 Is A Luxury Car And Interior Designer Company Cost In Crore

हॅपी बर्थडे गौरी खान : 500 कोटींच्या कंपनीची मालकिण आहे शाहरुख खानची पत्नी, दुबईत 24 कोटी तर मुंबईत आहे 200 कोटींचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिचा आज (8 ऑक्टोबर) वाढदिवस असून तिने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. गौरी स्टारवाइफ असली तरीदेखील तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  'मैं हूं ना', 'ओम शांति ओम', 'माय नेम इज खान', 'रा.वन' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांची ती निर्माती आहे. याशिवाय ती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट या होम प्रॉडक्शनची को-फाउंडर आहे. फिल्मी दुनियेत अॅक्टिव असण्यासोबतच गौरी एक इंटेरिअर डिझायनरदेखील आहे. तिने दुबईत स्वतःचे स्टोअर सुरु केले आहे. याशिवाय 2012 मध्ये हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझानसोबत मिळून मुंबईतही एक फॅशन स्टोअर सुरु केले आहे. शाहरुखच्या संपत्तीविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला गौरी खानच्या 5 महागड्या गोष्टींविषयी सांगत आहोत. 

 

1. इंटेरिअर डिझायनिंग कंपनी
गौरी खानची स्वतःची इंटेरिअर डिझायनिंग कंपनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीची किंमत सुमारे 150 कोटी आहे. 

 

2. प्रॉडक्शन हाऊस
गौरीने पती शाहरुख खानसोबत रेड चिलीज एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसची सहमालकिण आहे. या प्रॉडक्शन हाऊसची किंमत 500 कोटी आहे.

 

3. दुबई  व्हिला
गौरीजवळ दुबईत एक व्हिला आहे. तिच्या या लग्झरिअस व्हिलाची किंमत 24 कोटी इतकी आहे. 

 

4. मुंबईतील घर
गौरी मुंबई स्थित 200 कोटींच्या मन्नत या आलिशान बंगल्याची मालकिण आहे. 

 

5. कार
गौरीजवळ Bentley Continental GT ही आलिशान कार असून त्याची किंमत 2.25 कोटी आहे. 

 

या स्टार्सचे घर केले आहे गौरीने डिझाइन 
- गौरीने आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीच्या घराचे इंटेरिअर डिझायनिंग केले आहे. याशिवाय जॅकलिन फर्नांडिज, वरुण धवन, रणबीर कपूर आणि आणखी काही प्रसिद्ध सेलिब्रिटी तिच्या फॅशन स्टोअरमध्ये कायम भेट देत असतात.
- गौरी शाहरुखच्या आगामी 'जीरो' या चित्रपटाचीही निर्माती आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून आनंद एल राय चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  

बातम्या आणखी आहेत...