आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mystery Girl सोबत शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा फोटो व्हायरल, ही लंडनची ब्लॉगर आहे का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आर्यनने हॉलीवुड फिल्म 'द लॉइन किंग'च्या हिंदी व्हर्जनमध्ये आपला आवाज दिला आहे. या चित्रपटात शाहरुख आणि आर्यन दोघांनीही डबिंग केली आहे. आर्यनने सिंबा तर शाहरुखने मुफासाला आवाज दिला आहे. 


आर्यन चर्चेत येण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याचे अभिनयात होणारे पदार्पण
मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान लवकरच 'हिरण्यकश्यप' या दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या चित्रपटात प्रभास, राणा दगुबाती, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी असणार असल्याचे सांगितले जात आहे.  


तिसरे कारण : लंडनच्या ब्लॉगरला डेट करण्याचे वृत्त
मागील काही दिवसांपासून आर्यन लंडनच्या एका ब्लॉगरला डेट करत असल्याचे बातमी आली होती. आर्यन तिची आणि गौरी खानची भेट देखील घडवून दिली आहे. याशिवाय आर्यनचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोमध्ये आर्यनची त्या मुलीसोबत खूप जवळीक असल्याचे दिसत आहे. असे असले तरी ती मुलगी कोण आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण ही मुलगी आर्यन ज्या ब्लॉगरला डेट करत आहे तीच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.