आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shaheed Army Man Mahesh Kumar Meena Body Reached His Parental Village In Rajasthan Sikar For Last Rights After He Lost His Life In Pulwama District In J&K

शहीद जवानाची मुलगी म्हणाली-\'आई रडू नकोस, पप्पाने देशासाठी खुप मोठे काम केले आहे\', हे ऐकताच मुलीला मीठी मारून रडली आई...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रींगस(राजस्थान)- श्रीनगरच्या पुलवामा जिल्ह्यात शहीद झालेल्या महेश कुमार मीणा यांचे पार्थिव त्यांचे गाव लांपुवा मध्ये बुधवारी आणले गेले. पतीचे पार्थिव पाहून सरोज देवी यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर त्यांनी 11 वर्षांची मुलगी पलक आईचे डोळे पुसत म्हणाली, रडू नको...पप्पाने देशासाठी मोठे काम केले आहे. हे ऐकताच आईने मुलीला जवळ घेऊन हंबरडा फोडला. लहान मुलीचे ते बोलने ऐकुण उपस्थित सगळ्यांना अश्रु अनावर झाले. सकाळी 10.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली, सगळ्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली दिली.


आर्मीने दिला गार्ड ऑफ ऑनर 
शहीद महेश कुमार मीणा यांच्या मृतदेहाची सन्मानाने सीआरपीएफ ग्रुप सी टू आणि आरएएफ रॅपिड अॅक्शन फोर्स 83वीं बटालियनचे अधिकारी आणि जवानांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यविधी केला.


चकमकीत लागली होती गोळी 
5 जानेवारीला पुलवामाच्या त्राल परिसरात दहशदवादी आणि बटालियनमध्ये समोरा-समोर चकमक झाली होती, त्यात महेश यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर पाच दिवस त्यांच्यावर उपाचर झाले पण दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी पूर्ण गाव त्यांच्या घरी आले होते. शहीद जवान महेश कुमार अमर रहे अशा घोषणा गावभर घुमत होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...