आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

-20 डिग्रीमध्ये ड्यूटी करताना जवान शहीद, 7 महिन्यांच्या मुलीसोबत दिवाळी साजरी करण्याचे वाचन देऊन गेले होते, घरी आली बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमाधोपुर (राजस्थान) - जम्मू-काश्मीरच्या द्रास सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर ड्युटी दरम्यान हिमवर्षावामुळे झालेल्या भूस्खलनात 19 ऑक्टोबरला शहीद झालेले आर्मीचे जवान महेशकुमार निठारवाल यांच्यावर त्यांच्या पैतृक गाव गांव ढाणी बीजावाला (हांसपुर) येथे राजकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद महेशकुमार यांच्या सात महिन्याच्या मुलीने त्यांना मुखाग्नी दिला. दुधाची बाटली हातामध्ये घेण्याच्या वयात अनुष्काने तिरंगा हातामध्ये घेतला होता. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे पाणावले होते. लोक भारत मातेचा जयजयकार करत होते. जवानांनी तीन राऊंड फायर करून सलामी दिली.


शहीद महेशकुमार यांना मुलीसोबत पहिली दिवाळी साजरी करण्याची इच्छा होती 
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शहीद महेशकुमार निठारवाल यांचे पार्थिव घरी पोहोचले. घराजवळच त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये सन्मानात त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. शहीद महेशकुमार निठारवाल तीन वर्षांपूर्वी 6-राज रिफ बटालियनमध्ये भरती झाले होते. 20 वाहिन्यांपूर्वी महेश यांचे लग्न झाले होते. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे. मागील वर्षी जुलैमध्ये महेश घरी आले होते. तेव्हा त्यांनी कुटुंबियांना दिवाळीला घरी येईल असे सांगितले होते. मुलगी अनुष्कासोबत त्यांना दिवाळी साजरी करण्याची इच्छा होती.


18 हजार फूट उंचीवर -20 डिग्री तापमानात देशाचे रक्षण करताना शहीद झाले होते महेश 
अंत्ययात्रेसाठी सोबत आलेल्या युनिटच्या जवानांनी सांगितले की, महेशकुमार निठारवाल 18 हजार फूट उंचीवर असलेल्या पोस्टवर तैनात होते. तापमान -20 डिग्री होते. 19 ऑक्टोबरला हिमवृष्टी चालू होती. अचानक भूस्खलन झाल्यामुळे महेश बर्फाखाली दाबले गेले. जवळ असलेल्या मित्रांना काही लक्षात येण्याच्या आताच ते दोनशे फूट खोल बर्फात गाडले गेले. काही तासांनी जवानांनी त्यांना शोधून काढले परंतु ते शहीद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...