आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशासाठी शहीद झाले राजेंद्र प्रसाद, आठवडाभरापूर्वी सुटीहून परत गेले होते ड्युटीवर.. सुटीमध्ये ठरवले मुलाचे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर - जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले सीआयएसएफचे जवान राजेंद्र प्रसाद यांच्या पार्थिवावर त्यांच्या चैनपुरा गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दहशतवाद्यांविरोधात लढताना राजेंद्र प्रसाद यांनी अनन्यसाधारण शौर्य दाखवले. संपूर्ण गावात त्यांच्या शहीदत्वाचीच चर्चा होती. देशभक्तीच्या घोषणा देत मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 


मानेवर लागली गोळी 
सीआयएसएफ आणि पोलिसांच्या जवानांनी शहीद प्रसाद यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिली. राजेंद्र प्रसाद यांचा स्वभाव अत्यंत चांगला होता असे त्यांचे पार्थिव आणलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 27 ऑक्टोबरला रात्री राजेंद्र प्रसाद यांची ड्यूटी भगुरा पॉवर ग्रिड येथे होती. त्याच दरम्यान रात्री एक वाजता काही दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी स्नायपरने हल्ला केला. ड्युटीवर असलेल्या राजेंद्र प्रसाद यांनी लगेचच गोळ्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी ग्रेनेडद्वारे हल्ला केला. पण राजेंद्र प्रसाद लढा देत राहिले. त्याचदरम्यान एक गोळी त्यांच्या मानेला लागली आणि ते शहीद झाले. राजेंद्र प्रसाद आठवडाभरापूर्वीच सुट्या संपवून ड्युटीवर परतले होते. याचदरम्यान त्यांनी मुलाचे लग्न ठरवले होते. जानेवारीत त्याचे लग्न होणार होते, त्याची तयारी सुरू होती. 


अंत्ययात्रेत संपूर्ण गाव सर्वांच्या डोळ्यात पाणी 
राजेंद्र प्रसाद यांच्या अंत्य यात्रेत संपूर्ण गावातील आणि आजुबाजुच्या गावातील लोकही सहभागी झाले होते. सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. 

बातम्या आणखी आहेत...