Home | Gossip | Shahid gets filmfare for The most stylish celeb, Shahid And Kareena Love Story

शाहिद कपूरने Ex-गर्लफ्रेंडच्या बहिणीच्या हातून स्वीकारला अवॉर्ड, गळाभेट घेते फोटो देखील काढला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 11:00 AM IST

15 वर्षांपूर्वी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा ब्रेक-अप झाला होता.

  • Shahid gets filmfare for The most stylish celeb, Shahid And Kareena Love Story

    मुंबई - फिल्मफेअर ग्लॅमर अॅन्ड स्टाइल अवॉर्ड नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला. यामध्ये अभिनेता शाहिद कपूरला मोस्ट स्टायलिश पुरस्कार मिळाला. शाहिदला हा पुरस्कार एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरची बहिण करिश्माच्या हातून देण्यात आला. शाहिद कपूरने सहज तो पुरस्कार स्वीकारला आणि करिश्माला ग्रीट करत सोबत फोटो देखील काढले आहेत. शाहिद कपूरने तीन वर्षांपूर्वी मीरा राजपूतशी विवाह केला. तत्पूर्वी तो करीना कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होता.


    अशी सुरू झाली होती शाहिद करीनाची लव्ह स्टोरी
    करीना आणि शाहिदची पहिली भेट चित्रपट 'फिदा' (2004) च्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. शाहिदला पाहून करीना इतकी खुश होती की तिने शाहिदला थेट प्रपोज केला होता. करीनाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट मान्य केली होती. तिने कित्येक फोन आणि मेसेज केल्यानंतर अखेर शाहिदचा होकार मिळवला होता. स्क्रीनवर 'जब वी मेट' चित्रपट वगळता दोघांची जोडी फ्लॉप ठरली. पण, याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये वितुष्ट आले. या दोघांमध्ये ब्रेक-अप होण्यासाठी संशय कारणीभूत ठरला होता असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की ब्रेक-अप शाहिद कपूरने केला होता. यानंतरही करीनाने नाते जपण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, काहीच निष्पन्न झाले नाही.

Trending