Home | Gossip | shahid kapoor and his wife meera rajput goes for outing without kids, users trolling them

मुलांना सोडून पत्नी मीरासोबत आउटिंगसाठी निघाला शाहिद कपूर, दोघांना पाहून सोशल मीडिया यूजर्स करत आहेत प्रश्न, एकाने विचारले - मुले कुठे आहेत ? : Video

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 05:32 PM IST

मुले आईसाठी रडत आहेत आणि हे रेस्तरॉ आणि एअरपोर्टवर फिरण्यात व्यस्त आहेत - एक यूजर

 • shahid kapoor and his wife meera rajput goes for outing without kids, users trolling them

  एंटरटेनमेंट डेस्क : शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत आउटिंगसाठी निघाला आहे. यावेळी शाहिदने ब्लॅक कलरचा ट्रक सूट घातला आहे तर मीरा ब्लॅक जीन्स आणि ब्लू कलरच्या टॉपमध्ये दिसली. सोशल मीडियावर दोघांचेही फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत आहेत. मुलांना एकटे सोडून फिरायला जाण्याबद्दल यूजर्स दोघांना ट्रोल करत आहेत. एका यूजरने विचारले, 'मुले कुठे आहेत ?' दुसऱ्या एकाने कमेंट केले, '7 महिन्याच्या मुलाला एकटे सोडून फिरायला जाणे गरजेचे आहे का ?'

  याप्रकारेच इतर यूजर्सनेही कमेंट केले...
  - एक यूजर म्हणाला, 'पॅरेंटिंगविषयी बोलतात आणि मुलांना एकटे सोडून फिरायला जातात.' एकाने लिहिले, 'मुले आईसाठी रडत आहेत आणि हे रेस्तरॉ आणि एअरपोर्टवर फिरण्यात व्यस्त आहेत.'

  - एका यूजरने तर करीना कपूरची कॉपी केल्याबद्दल मीराची खिल्ली उडवली. एकजण म्हणाला, 'पतीच्या पुढे पुढे अशी चालते आहे जशी काही हीच सेलिब्रिटी आहे.' एकाने मीराच्या लुकवर कमेंट केली, 'उन्हाळ्यात वुलन टॉप आणि बूट.' एकजण म्हणाला, 'आता यांनाही फिरायचे आहे कारण करिना फिरायला गेली आहे ना.'

  - शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्याची अपकमिंग फिल्म 'करीब सिंह' आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे कोणत्याच फिल्मची ऑफर नाही.'

Trending