Home | News | shahid kapoor and mira rajput blessed with baby boy

शाहिद कपूर आणि मीरा राजपुत यांना पुत्ररत्न, नव्या पाहुण्याचे बॉलिवूडकरांकडून होतेय स्वागत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 10:14 AM IST

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला आहे. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला.

 • shahid kapoor and mira rajput blessed with baby boy

  एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला आहे. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला. प्रसुती वेदना सुरू झाल्याने मीराला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी 4 च्या सुमारास मीराला मुलगा झाला. या दोघांना 2 वर्षांची एक मुलगी आहे. तिचे नाव मीशा असे आहे. मीरा राजपूतमधला ‘मी’ आणि शाहीद मधला ‘शा’ अशी पहिली अक्षरं जुळवत त्यांनी मुलीचे नाव ठेवले आहे. आता मुलाचे नाव काय ठेवले जाणार याची उत्सुकता कायम आहे.

  शाहिद मीरा नुकतेच झाले होते स्पॉट
  शाहीद कपूर आणि मीरा राजपूत सोमवारीच मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी शाहिद मीराची पुरेपुर काळजी घेत होता. शाहीद कपूरने सध्या त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले आहे. या सिनेमाचे शूटिंग आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल अशीही चर्चा आहे. मीराला प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रूग्णालयात मीराची आई, शाहीद कपूरचे वडिल आणि अभिनेते पंकज कपूर, इशान खट्टर हे सगळेही उपस्थित होते अशीही माहिती मिळते आहे.

  बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

  शाहिद आणि मीरा राजपूतच्या पुत्राचे बॉलिवूडकरांकडून स्वागत होतोय. सोशल मीडियावर शाहिद, मीरा आणि मीशाच्या फॅन क्लबवरुन दोघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रिती झिंटाने शाहिद आणि मीराला शुभेच्छा दिल्या आहेत.

Trending