आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor And Mira Rajput Shift Their New Apartment In Next Year With Newborn Baby And Daughter Misha

ऐश्वर्या-ट्विंकलची शेजारी होणार शाहिद कपूरची पत्नी, 56 कोटी आहे नवीन घराची किंमत, पार्किंग एवढी मोठी की पार्क होती 6 कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत याकाळात त्यांचा मुलगा झैन (जन्म 5 सप्टेंबर 2018) सोबत वेळ घालवत आहेत. 2019 या नवीन वर्षासाठी या कपलने यूनिक प्लान बनवला आहे. नवीन वर्षात शाहिद आणि मीरा यांनी जुहूस्थित Praneta Apartments मधील घर सोडून नवीन घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिद आणि मीरा यांचे नवीन घर हे ड्यूप्लेक्स असून Three Sixty West वरळी येथे आहे. त्यांचा नवीन फ्लॅट 42 आणि 43 व्या मजल्यावर आहे. त्यांच्या घराचा एरिया 427.98 sq metre ते 300.48 sq metre पर्यंत असून यामध्ये 40.88 sq मीटरची बाल्कनी आहे. सोबतच त्यांच्या नवीन घरात 6 गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे. 56 कोटींत हा फ्लॅट त्यांनी खरेदी केला आहे. याच बिल्डिंगमध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना आणि अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांचेही घर आहे.

 

कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिदसोबत झाले मीराचे लग्न...
- दिल्लीच्या मीरा राजपूतचे लग्न जुलै 2015 मध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबत झाले. मीरा त्याकाळात नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकत होती. ती इंग्लिश ऑनर्सचे पदवी शिक्षण घेत होती.
- लग्नाच्या वेळी मीरा 21 तर शाहिद 34 वर्षांचा होता. लग्नाच्या वर्षभराने म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी मीराने मुलगी मीशाला जन्म दिला. 26 ऑगस्ट 2016 रोजी मीशाचा जन्म झाला. तर अलीकडेच त्यांचा मुलगा झैनचा जन्म झाला. 

 

शाहिदसोबत लग्नासाठी तयार नव्हती मीरा...
- मीरा शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. वयातील एवढ्या अंतरामुळे सुरुवातीला मीरा या लग्नासाठी तयार नव्हती. पण मीराच्या मोठ्या बहिणीने तिची समजूत घातल्यानंतर ती लग्नासाठी तयार झाली.

- एका मुलाखतीत शाहिदने खुलासा केला होता की, लग्नासाठी मीराने त्याच्याकडे एक अट ठेवली होती. लग्नात पुर्वीसारखे केस ठेवण्याची ही अट होती.

- झाले असे होते की, ज्याकाळात दोघांची भेट झाली होती, त्यावेळी शाहिद 'उडता पंजाब' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. चित्रपटासाठी शाहिदने केस वाढवले होते. लग्नात केस कापावे लागेल, तरच लग्न करेल, असे मीरा शाहिदला म्हणाली होती.  

बातम्या आणखी आहेत...