आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Father Pankaj Kapoor Meets His Newborn Grandson And Daughter In Law Mira Rajput

सून-नातवाला बघायला पोहोचले पंकज कपूर, सासू सुप्रियाला अद्याप मिळाला नाही वेळ, शाहिदची आई म्हणाली - मुलाचे कुटुंब पूर्ण झाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मीराची आई बेला राजपूत, सासू नीलिमा अजीम आणि दीर ईशान खट्टर यांनी नवजात बाळाची भेट घेऊन मीराची विचारपूस केली. गुरुवारी संध्याकाळी शाहिद त्याची मुलगी मीशाला हिला प्ले स्कूलमधून तिच्या धाकट्या भावाला भेटायला घेऊन गेला होता. तर संध्याकाळी शाहिदचे वडील पंकज कपूर हेदेखील सून आणि नातवाला बघायला पोहोचले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पंकज कपूर यांनी आपला आनंद व्यक्त केला. सोबत शाहिद आणि मीराला त्यांच्या या आनंदाबद्दल शुभेच्छा दिल्या. 


सासू सुप्रिया आणि त्यांच्या मुलांनी अद्याप घेतली नाही भेट...
- शाहिद आणि मीराच्या मुलाला भेटायला त्यांचे फॅमिली मेंबर्स रुग्णालयात येत आहेत. पण मीराची सासू सुप्रिया पाठक (पंकज कपूर यांची दुसरी पत्नी) यांनी अद्याप आपल्या सून आणि नातवाची भेट घेतली नाही.
- सुप्रियाच नव्हे तर त्यांची मुले शना कपूर (मीराची नणंद) आणि रुहान कपूर (मीराचा दीर) हेदेखील अद्याप हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. 
- सध्या मीराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही.
- शाहिदची आई नीलिमा अजीम या नातवाच्या आगमनामुळे अत्यंत आनंदी आहेत. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, "माझ्या मुलाचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे."  
- नीलिमा पुढे म्हणाल्या, "माझी सून मीरा अतिशय समंजस आहे. ती कुठलीली परिस्थितीत हाताळण्यासाठी स्ट्राँग आहे. मीशाला भाऊ मिळाला तर ईशानला त्याचा पुतण्या मिळाला आहे. मी आजी झाले आहे." 
- नीलिमा अजीम या पंकज कपूर यांच्या पहिल्या पत्नी आहेत, तर सुप्रिया पाठकसोबत पंकज कपूर यांनी दुसरे लग्न केले. 

 

डायपर बदलण्यात हुशार झाला आहे शाहिद..
- न्यूज पोर्ट्ल डीएनएशी बोलताना शाहिदने मुलाच्या जन्माचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, आता मी डायपर बदलण्यात खूप हुशार झालोय. 
- शाहिद म्हणाला, "मी पुर्वीपासूनच डायपर बदलण्यात हुशार आहे. मी केवळ मीशाचेच नव्हे तर ईशानच्याही नॅप्पी बदलल्या आहेत."

बातम्या आणखी आहेत...