Home | Gossip | Shahid kapoor in real life does not get angry on servants of his house

खऱ्या आयुष्यात कधीही घरातील नोकरांवर चिडत नाही शाहिद कपूर, एखादा ग्लास फुटल्यावर स्वतःच मागतो माफी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 03:15 PM IST

भूमिकेत शिरण्यासाठी प्यायचा 20-20 सिगारेट

 • Shahid kapoor in real life does not get angry on servants of his house

  बॉलिवूड डेस्क : शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'कबीर सिंह' 21 जूनला रिलीज होत आहे. चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये कबीर सिंह रागात लाल लाल होऊन आपल्या मोलकरणीला रस्त्यावर पळवतो. कारण चुकून तिच्याकडून एक ग्लास फुटतो. मात्र खऱ्या आयुष्यात शाहिद खूप शांत व्यक्ती आहे. विशेष म्हणजे कबीर सिंहसारखा आपल्या घरातील नोकरांवर तो कधीच चिडत नाही.

  कपिलच्या शोमध्ये शाहिदने केला खुलासा...
  शाहिद अशातच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. यावेळी जेव्हा त्याला विचारले गेले की, तोदेखील कबीर सिंहसारखा घरच्या नोकरांवर कधी राग काढतो का ? उत्तरात शाहिदने सांगितले की, लग्नानंतर त्याची पत्नी मीराने घरात खूप नोकर ठेवले आहेत. पण तो कधीच त्यानच्यावर चिडत नाही. जेव्हा कधी एखादा फुटतो तर तो स्वतःच नोकरांची माफी मागतो आणि सफाई करायला सांगतो.

  भूमिकेत शिरण्यासाठी प्यायचा 20-20 सिगारेट...
  एप्रिलमध्ये शाहिदने चित्रपटाशी निगडित अनेक खुलासे केले होते. तेलगु फिल्म 'अर्जुन रेड्‌डी' च्या या हिन्दी रीमेकमध्ये शाहिद दारुड्या आणि स्मोकर डॉक्टरचा रोल करत आहे, जो मॅनेजमेंटवर रागावलेला असतो. भूमिकेत प्राण ओतण्यासाठी शाहिद प्रत्येक दिवशी स्मोकिंग करायचा. शूटिंगदरम्यान तो रोज 20 पेक्षा जास्त सिगारेट-विड्या प्यायचा. याबद्दल तो म्हणाला होता, "मी स्मोकिंगची जाहिरात करत नव्हतो. पण भूमिकेसाठी मला हे करावे लागले. शूटिंगदरम्यान प्रत्येकदिवशी 20 सिगारेट प्यायचो. त्यामुळे घरात मला आपल्या मुलांजवळ जाण्यापूर्वी फ्रेश व्हायला दोन तास लागायचे, जेणेकरून माझ्यापासून स्मोकिंगचा दुर्गंध येऊ नये."

  आधी 8 किलो वजन वाढवले, नंतर कमी केले 12 किलो...
  अँग्री यंग मॅनच्या लुकसोबत शाहिद कपूर चित्रपटात कॉलेज बॉय आणि मग एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी त्याने आधी 8 किलो वजन वाढवले, जेणेकरून तो एक दारुडा वाटेल. नंतर कॉलेज स्टुडंटचा लुक मिळवण्यासाठी सुमारे 12 किलो वजन कमी केले. चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगाने केले आहे

 • Shahid kapoor in real life does not get angry on servants of his house
 • Shahid kapoor in real life does not get angry on servants of his house

Trending