आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Photo: शाहिदची पत्नी मीराला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, नवजात बाळासोबत दिसले कपल, तीन दिवसांनी घरी आले बाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दुस-यांदा आईबाबा झाले आहेत. 5 सप्टेंबर रोजी मीराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला. शुक्रवारी मीराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटमधून बाहेर पडताना शाहिद आणि मीरा यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले दिसली. शाहिदच्या कडेवर मोठी मुलगी मीशा होती, तर मीराच्या हातात तिचे नवजात बाळ होते.

 

बाळाच्या जन्माच्या दोन दिवसांनी शाहिदने आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे. शाहिदने ट्वीट करुन बाळाचे नाव झैन ठेवल्याचे सांगितले. त्याने ट्वीट केले, 'आम्ही बाळाचे नाव झैन ठेवले आहे. झैन कपूर आमच्या आयुष्यात आला असून आता आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. मी सगळ्यांच्या प्रेमाबद्दल आभारी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.' 

 

24 वर्षांची झाली मीरा... 

- शाहिदची पत्नी मीरा राजपूत 7 सप्टेंबर रोजी 24 वर्षांची झाली आहे. शाहिदने मीराचा वाढदिवस रुग्णालयात साजरा केला. शाहिदसाठी हा डबल सेलिब्रेशनचा दिवस राहिला. 

- लग्नाच्या तीन वर्षांत मीरा दोन मुलांची आई झाली आहे. तिची मुलगी मीशा हिचा जन्म 26 ऑगस्ट 2016 रोजी झाला. तर 5 सप्टेंबर 2018 रोजी त्यांचा मुलगा जन्माला आला. 


हा आहे ज्युनिअर शाहिदच्या नावाचा अर्थ.. 
शाहिद-मीराने आपल्या चिमुकल्याचे नाव झैन ठेवले आहे. झैन हा एक अरेबिक शब्द असून त्याचा अर्थ सुंदर असा होतो. 


- शाहिदची आई नीलिमा अजीम नातवाच्या आगमनामुळे खूप आनंदी आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, "माझ्या मुलाचे कुटुंब आता पूर्ण झाला आहे. मीरा अतिशय समजूतदार आहे. ती प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास अतिशय स्ट्राँग आहे."

 

नातवाला भेटायला पोहोचली आजी सुप्रिया पाठक... 

पंकज कपूर यांच्या दुस-या पत्नी सुप्रिया पाठक त्यांच्या नातवाला भेटायला रुग्णालयात येऊ शकल्या नव्हत्या. पण नातू घरी पोहोचल्यावर त्या घरी आल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती पंकज कपूर आणि मुलगी शना कपूर होती. याशिवाय नीलिमा अजीम आणि ईशान खट्टरही घरी पोहोचले होते. 

बातम्या आणखी आहेत...